आश्वीत बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 02:42 PM2018-09-18T14:42:54+5:302018-09-18T14:43:10+5:30
संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील भरवस्तीत घुसुन बिबट्याने गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. यामुळे शेतक-याचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी बु येथील भरवस्तीत घुसुन बिबट्याने गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय जागीच ठार झाली. यामुळे शेतक-याचे सुमारे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
आश्वी बुद्रुक येथील स्टेट बँक चौकातील अशोक तुळशीराम ताजणे यांच्या भरवस्तीत असणा-या गोेठ्यामध्ये बांधलेल्या गायीवर सोमवारी रात्री एक वाजण्याचा सुमारास बिबट्याने हल्ला केले. गाय फस्त करत तेथुन पलायन केले. या घटनेने परीसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी आर.के.थेटे, नामदेव ताजणे, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. संपत तांबे यांनी घटनास्थळी भेट देउन पंचनामा केला. या परीसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावावा, अशी मागणी एकनाथ ताजणे, अभिजीत ताजणे, अशोक ताजणे, सुनिल घोडेकर, संजय ताजणे, राजेंद्र ताजणे, सौरभ लोंढे, दिपक पठाडे, निलेश रातडीया यांनी केली आहे