वाळू तस्करांकडून मंडल अधिका-याचे अपहरण; संतप्त वाळू तस्करांकडू पथकाच्या कारची मोडतोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 02:15 PM2020-03-06T14:15:32+5:302020-03-06T14:15:55+5:30

वाळू तस्करी करणारा ट्रक अरणगाव शिवारात गुरुवारी  (दि.६ फेब्रुवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जामखेड तहसीलदारांच्या पथकाने पकडला. सदर ट्रक  जामखेड तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना वाळू तस्करांनी मंडल अधिका-याचे अपहरण केल्याची घटना घडली. दरम्यान जामखेड पोलिसांनी ट्रकला अडवून मंडल अधिकाºयाची सुटका केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Abduction of a board officer by sand smugglers; Angry sand smugglers smash squad car | वाळू तस्करांकडून मंडल अधिका-याचे अपहरण; संतप्त वाळू तस्करांकडू पथकाच्या कारची मोडतोड

वाळू तस्करांकडून मंडल अधिका-याचे अपहरण; संतप्त वाळू तस्करांकडू पथकाच्या कारची मोडतोड

जामखेड : वाळू तस्करी करणारा ट्रक अरणगाव शिवारात गुरुवारी  (दि.६ फेब्रुवारी) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जामखेड तहसीलदारांच्या पथकाने पकडला. सदर ट्रक  जामखेड तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी नेत असताना वाळू तस्करांनी मंडल अधिका-याचे अपहरण केल्याची घटना घडली. दरम्यान जामखेड पोलिसांनी ट्रकला अडवून मंडल अधिकाºयाची सुटका केली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
घटनेची माहिती अशी की, अवैध गौण खनिज वाहतूक करणारा वाळूचा ट्रक शुक्रवारी रात्री महसूलच्या पथकाने पकडला. यावेळी मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे हे ट्रकमध्ये बसून ट्रक तहसील कार्यालयात नेत होते. यावेळी ट्रक ट्रक मालक व चालकाने ट्रक तहसीलमध्ये न नेता तो मंडल अधिकारी यांच्यासह ट्रक पळवून नेला. यावेळी चालक, मालकाने ट्रकमधील वाळू रस्त्यातच खाली केली. यानंतर हा ट्रक गव्हाणे यांना घेऊन बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील हद्दीत नेण्यात आला. या घटनेची माहिती जामखेडचे पथक प्रमुख तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी तातडीने जामखेड व आष्टी पोलिसांना  दिली. पळवलेल्या  ट्रकचा जामखेड पोेलिसांनी पाठलाग करुन आष्टी (जि. बीड) तालुक्यातील हद्दीत पकडला. ट्रकमधून मंडल अधिकारी गव्हाणे यांची सुटका केली. जामखेड पोलिसांनी ट्रक शुक्रवारी पहाटे जप्त करुन जामखेड पोलीस ठाण्यात आणला आहे. पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. 
वाळू तस्कारांनी कार फोडली
दरम्यान शुक्रवारी पहाटे संतप्त झालेल्या वाळू तस्करांनी महसूल पथकातील तलाठी हजारे यांच्या जामखेड येथील घरासमोर उभी असलेली कार फोडली. यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.  या घटनेप्रकरणी मंडल अधिकारी गव्हाणे यांचे पोलिसांत फिर्याद देण्याचे काम सुरू होते. दरम्यान वाळू तस्कारांच्या दहशतीने जामखेड शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 
महसूल कर्मचारी संघटनेचे काम बंद आंदोलन 
 सदर घटनेचा महसूल कर्मचा-यांनी निषेध केला आहे. तहसीलदार, कर्जत उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या निवेदनावर कामगार तलाठी सुखदेव कारंडे, एस.के.खिळे, एस. आर. शेख,  ए.पी.जोशी,  जी.जे.नागोरे, आर. जे.गावीत, एस. एस. हजारे यांच्यासह ३२ कर्मचाºयांच्या सह्या आहेत.

Web Title: Abduction of a board officer by sand smugglers; Angry sand smugglers smash squad car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.