नगर बाजार समितीच्या सभापतीपदी अभिलाष घिगे; उपसभापतीपदी संतोष म्हस्के 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 05:59 PM2020-03-13T17:59:29+5:302020-03-13T18:00:11+5:30

दादा पाटील शेळके नगर बाजार समितीच्या सभापतीपदी तांदळी वडगावचे सरपंच अभिलाष घिगे यांची तर उपसभापतीपदी वाळुंजचे संतोष म्हस्के यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच तरूणांच्या हाती समितीचे सूत्रे देण्यात आली आहेत.

Abhilash Ghig to chair the city market committee; Santosh Mhaske as the Vice-President | नगर बाजार समितीच्या सभापतीपदी अभिलाष घिगे; उपसभापतीपदी संतोष म्हस्के 

नगर बाजार समितीच्या सभापतीपदी अभिलाष घिगे; उपसभापतीपदी संतोष म्हस्के 

केडगाव : दादा पाटील शेळके नगर बाजार समितीच्या सभापतीपदी तांदळी वडगावचे सरपंच अभिलाष घिगे यांची तर उपसभापतीपदी वाळुंजचे संतोष म्हस्के यांची शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच तरूणांच्या हाती समितीचे सूत्रे देण्यात आली आहेत.
बाजार समितीची निवडणूक नोव्हेंबर २०१७ मध्ये झाली होती. त्यात सर्वच्या सर्व १७ जागा निवडून आणत कर्डिले-कोतकर-जगताप यांच्या गटाने एकहाती सत्ता काबीज केली होती. पहिल्या वेळी सभापतीपदी विलास शिंदे यांची तर रेश्मा चोभे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. मागील महिन्यात सभापती शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा उपनिबंधकाकडे पाठवला. तर उपसभापती रेश्मा चोभे यांचा राजीनामा संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता.
शुक्रवारी सभापतीपदासाठी घिगे तर उपसभापतीपदासाठी म्हस्के यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. आहेर यांना बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी निवड प्रक्रियेत सहकार्य केले.
नव्या पदाधिकाºयांची निवड जाहिर झाल्यानंतर माजी आमदार कर्डिले व आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते नव्या पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी युवा नेते अक्षय कर्डिले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा.माणिक विधाते, हरिभाऊ कर्डिले, अशोक झरेकर, विलासराव शिंदे, उपसभापती रेशमाताई चोभे, मिराताई कार्ले, दिलीप भालसिंग, संतोष कुलट, बन्सी कराळे , बाबासाहेब खर्से, बाळासाहेब निमसे, बाबासाहेब जाधव, वसंतराव सोनवणे, बबनराव आव्हाड, उद्धवराव कांबळे, राजेंद्रकुमार बोथरा, बहिरू कोतकर , रावसाहेब साठे, शिवाजी कार्ले, अनिल मेहेत्रे, दिलीप झिपुर्डे, सुरेश सुंबे, बाजीराव हजारे उपस्थित होते.
कर्डिले-जगताप यांच्या बैठकीत निर्णय
जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी बाजार समितीच्या सभागृहात नव्या पदाधिकारी निवडण्याची प्रक्रिया पार पडली. तत्पूर्वी माजी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरूण जगताप यांनी कर्डिले यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व संचालकांची बैठक घेतली. त्यात संचालकांची मते जाणून घेतल्यानंतर सभापतीपदासाठी अभिलाष घिगे यांचे तर उपसभापतीपदासाठी संतोष म्हस्के यांचे नाव निश्चित करण्यात आले. 
 

Web Title: Abhilash Ghig to chair the city market committee; Santosh Mhaske as the Vice-President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.