घारगाव प्राथमिक केंद्रांतर्गत सुमारे १२०० ग्रामस्थांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:19 AM2021-04-14T04:19:14+5:302021-04-14T04:19:14+5:30
प्राथमिक आरोग्य केंद्र घारगाव अंतर्गत घारगाव, बोरबन, आंबी खालसा, कोठे बु, कोठे खुर्द, वनकुटे, नांदूर खंदरमाळ, खंदरमाळवाडी, माळेगाव पठार ...
प्राथमिक आरोग्य केंद्र घारगाव अंतर्गत घारगाव, बोरबन, आंबी खालसा, कोठे बु, कोठे खुर्द, वनकुटे, नांदूर खंदरमाळ, खंदरमाळवाडी, माळेगाव पठार आदी गावे जोडलेली आहेत. या गावांमधील ४५ वर्षांवरील पुढील नागरिकांना लस देण्यात येत आहे. लसीकरणासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र ढेरंगे व अमृता पाटील यांनी समस्त जनतेला लसीकरणाचे आवाहन केले आहे. कोविडची प्रतिबंधात्मक लस पूर्णपणे सुरक्षित असून, लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे जेणेकरून आपण आपले व आपल्या कुटुंबाचे कोरोनापासून रक्षण करू शकू, असेही त्यांनी सांगितले.
लसीकरण मोहिमेत आरोग्य सहायक संतोष खडके, गणेश हिकरे, आरोग्य सेवक प्रकाश म्हात्रे, गजानन काळे, प्रशांत माने, संदीप गट, आरोग्य सेविका संगीता पठारे, दीपाली मुन्तोडे हे आरोग्य कर्मचारीही मेहनत घेत आहेत.