कोरोना रुग्णांसाठीचे ५० टक्के बेड रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:23 AM2021-05-25T04:23:44+5:302021-05-25T04:23:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. रुग्णांना सोबत घेऊन बेडसाठी नातेवाइकांनी ...

About 50% of corona beds are empty | कोरोना रुग्णांसाठीचे ५० टक्के बेड रिकामेच

कोरोना रुग्णांसाठीचे ५० टक्के बेड रिकामेच

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : एप्रिल महिन्यात कोविड रुग्णालयात बेड मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागली. रुग्णांना सोबत घेऊन बेडसाठी नातेवाइकांनी रुग्णालयांचे उंबरठे झिजवले. बेड मिळाले नाही म्हणून अनेकांना प्राणालाही मुकावे लागले. बेड उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्री, प्रशासनाचीही झोप उडाली होती. आता मात्र रुग्णांची संख्या घटल्याने एकूण बेडच्या क्षमतेपैकी ५० टक्के म्हणजे १४ हजार बेड रिकामेच असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही १५ हजारांच्या आत आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील मार्च, एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती भीषण झाली होती. कोरोनाबाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या ४,५०० च्या वर गेली होती, तर पॉझिटिव्हीटीचा दर ५० टक्क्यांच्यावर गेला होता. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही २८ हजारापर्यंत पोहोचली होती. जिल्ह्यात २७ हजार बेडची क्षमता आणि त्यापेक्षा सक्रिय रुग्णांची संख्या जास्त असल्याने जिल्ह्यात बेड उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला होता. एक बेड मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक आपली सर्व ताकद पणाला लावून शोधाशोध करीत होते. मात्र आता ही परिस्थिती बदलली आहे. मे महिना सुरू होताच कोरोनाबाधितांची निम्म्याने घटल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे एकूण क्षमतेपैकी निम्मे म्हणजे ५० टक्के बेड रिकामेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

----------------

तालुकानिहाय बेडची स्थिती

तालुका एकूण बेड रुग्ण शिल्लक

अकोले १२२० ५०७ ७१३

जामखेड ८८१ ६०३ २७८

कर्जत १११४ ५४२ ५७२

कोपरगाव १४६४ ५४७ ९१७

नगर १२४२ ७३५ ५०७

नेवासा १२४० १०४४ १९६

पारनेर २६८९ ११५० १५३९

पाथर्डी १९८० ११४३ ८३७

राहाता १९८० ११४३ ८३७

राहुरी १६३७ ८०५ ८३२

संगमनेर ३२३२ १३७८ १८५४

शेवगाव १०७५ ९९८ ७७

श्रीगोंदा १४६९ ६६० ८०९

श्रीरामपूर १४८४ ७०७ ७७७

नगर शहर ३७८९ ५६३ ३२२६

भिंगार ७० ०२ ६८

एकूण २७२०४ १२२८७ १४९१७

---------------

बेडची क्षमता

केंद्र एकूण क्षमता रुग्ण शिल्लक

डीसीएच ६४७ ५०४ १४३

सीसीसी १६४४४ ६०८६ १०३५८

डीसीएचसी १०११३ ४५५९ ५५५४

ऑक्सिजन बेड ४१५० २४०६ १७४४

आयसीयू १३३२ ६५७ ५७५

व्हेन्टीलेटर ३३६ २२७ १०९

१८ मेची स्थिती २६५२३ १४२६० १२२६३

२३ मेची स्थिती २७२९४ १२२८७ १४९१७

------------------

जिल्ह्यामध्ये गृह विलगीकरण पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. प्रत्येक गावात कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी गावपातळीवर पथके नेमली. तसेच चाचण्यांची संख्या दुप्पट करण्यात आली. त्यामुळे कोरोनाबाधितांचा शोध घेण्यात यशस्वी ठरलो. कडक निर्बंधही लागू आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या घटली आहे.

डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी

-------------

सक्रिय रुग्णही घटले

दिनांक सक्रिय रुग्ण

१० मे २७८६५

१८ मे १९७६०

२३ मे १५१४६

Web Title: About 50% of corona beds are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.