दुष्काळाच्या बैठकीला दांडी; १२ बँक अधिकाऱ्यांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 04:40 AM2019-05-20T04:40:01+5:302019-05-20T04:40:12+5:30
अनुदान वाटप आढावा : शासनाच्या आदेशांचे केले उल्लंघन
अहमदनगर : शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान वाटप संदर्भात जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीला बँकेच्या अधिकाºयांनी दांडी मारल्याने जिल्ह्यातील बारा बँकांच्या अधिकाºयांविरोधात शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला
आहे़
याप्रकरणी गृह शाखेच्या नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांनी शनिवारी नगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़ सध्या जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. या पार्श्वभूमीवर शेतकºयांसाठी आलेल्या अनुदानाच्या वाटपाची स्थिती काय आहे, याबाबत १७ मे रोजी आढावा बैठक झाली. ही बैठक जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आयोजित केली होती. या बैठकीबाबत संबंधित बँकांना निरोप देण्यात आले होते. बैठकीला मात्र १२ बँकांच्या अधिकाºयांनी दांडी मारल्याने त्यांच्याविरोधात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़ गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नेहा जोशी (आंध्रा बँक), मंगेश कदम (इंडियन बँक), चरणदीप (ओरिएन्टल बँक), माने, (पंजाब नॅशनल बँक), जी. के. देशपांडे (युनियन बँक), सातपुते (महाराष्ट्र ग्रा़ बँक), वसंत पिल्लेवार (देना बँक), गोविंद झा (विजया बँक), सुयोग ब्राह्मणे (युनायटेड बँक), धीरज (अलाहाबाद बँक), विकास निकाळजे (स्टेट बँक), गायकवाड (व्यवस्थापक जिल्हा सेंट्रल बँक) यांचा समावेश आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे पुढील तपास करत आहेत़
बँकांना दुष्काळाचे गांभीर्य नाही; पालकमंत्र्यांनाही दिली नाही दाद
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील ६ लाख ३६ हजार ७९० शेतकºयांना आचारसंहितेपूर्वी अनुदान वाटप करण्यात आले आहे़ उर्वरित शेतकºयांना मात्र अद्याप अनुदानाचे वाटप झालेले नाही़ तसेच शेतकºयांनी पीक विमा, दुष्काळ अनुदान संदर्भात बँक कर्मचाºयांची मुजोरी आदी संदर्भात तक्रारी केल्या होत्या़ १३ मे रोजी पालकमंत्री राम शिंदे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत बँक अधिकाºयांनी तातडीने शेतकºयांसाठी आलेले पैसे त्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ त्यानंतर पालक सचिव आशिषकुमार सिंह यांनीही पाच दिवसांपूर्वी टंचाई आढावा बैठक घेतली होती़ त्यांनीही बँकांना शेतकºयांचे पैसे तातडीने वर्ग करण्याचे आदेश दिले होते़ या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या अधिकाºयांची बैठक बोलाविली होती़ या सभेलाच बँकेच्या अधिकाºयांनी दांडी मारत हा विषय गांभीर्याने घेतला नाही़