कोपरगाव जलसंपदाच्या अधिका-यास शिवीगाळ; ३ शेतक-यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:36 PM2018-02-26T16:36:09+5:302018-02-26T16:36:31+5:30
लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिका-यास अडथळा आणून शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पती-पत्नी व पुत्र अशा तिघा शेतक-यांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोपरगाव : तालुक्यातील लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेलेल्या जलसंपदा विभागाच्या अधिका-यास अडथळा आणून शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी देणा-या पती-पत्नी व पुत्र अशा तिघा शेतक-यांविरूध्द तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची माहिती अशी, जलसंपदाचे सहाय्यक अभियंता सचिन तुकाराम ससाणे हे त्यांचे सहकारी व काही शेतक-यांसमवेत शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील लौकी शिवारात चारी क्रमांक १ चे प्रवेशद्वार उघडण्यासाठी गेले होते. दरम्यान प्रवेशद्वार उघडत असताना पांडूरंग शामराव खटकाळे, सागर पांडूरंग खडकाळे व जनाबाई पांडूरंग खटकाळे यांनी अडथळा निर्माण केला. तसेच शिवीगाळ करून विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. याप्रकरणी ससाणे यांनी रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी वरील पती-पत्नी व पुत्राविरूध्द सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक साहेबराव कडनोर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अहिरे करीत आहेत.