जिल्हा विकास आराखड्याच्या कामाला गती द्या; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतली बैठक

By साहेबराव नरसाळे | Published: June 16, 2023 05:51 PM2023-06-16T17:51:08+5:302023-06-16T17:54:22+5:30

शासन आपल्या दारी उपक्रम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

Accelerate the work of District Development Plan; Collector Siddharam Salimath held the meeting | जिल्हा विकास आराखड्याच्या कामाला गती द्या; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतली बैठक

जिल्हा विकास आराखड्याच्या कामाला गती द्या; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी घेतली बैठक

अहमदनगर : जिल्ह्यातील सामाजिक-आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक संसाधनांमधील असमानता आणि जलद शहरीकरणाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज या सर्व बाबींसह जिल्हा विकास आराखडा तयार करण्याचे काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.१६) जिल्हा विकास आराखड्याबाबत सालीमठ यांनी विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, जिल्हा विकास आराखडा तयार करत असताना कृषी, उद्योग, पर्यटन, पशसंवर्धन विकास या बाबींबरोबरच विकासाच्या संधी आलेल्या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात यावे. जिल्ह्यात दळणवळणाची साधने विकसित होत आहेत. त्यादृष्टीनेही विकास आराखडा करत असताना नियोजन करावे. जीडीपी दर वृद्धीमध्ये कृषी विभागाचा मोठा वाटा आहे. कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढीबरोबरच कृषीप्रक्रिया व स्टोरेजवर अधिक भर देण्यात यावा. राज्याच्या जीडीपी दरामध्ये जिल्ह्याच्या योगदानाची विभागनिहाय माहिती तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

शासन आपल्या दारी उपक्रम संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दोन लक्ष लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. सर्व विभागांनी त्यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ जिल्ह्यातील सर्वसामान्य व्यक्तींना अधिकाधिक स्वरुपात देण्यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Accelerate the work of District Development Plan; Collector Siddharam Salimath held the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.