‘आरटीई’द्वारे श्रीमतांच्या मुलांना प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:20 AM2021-04-04T04:20:39+5:302021-04-04T04:20:39+5:30
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना असोसिएशनच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. डॉ.नीलिमा निघूते, संज्योत वैद्य, स्वाती शहा, समीर शहा, सोनाली ...
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना असोसिएशनच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले. डॉ.नीलिमा निघूते, संज्योत वैद्य, स्वाती शहा, समीर शहा, सोनाली गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात शाळा ऑनलाइन घेण्यात आल्या.
विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याकरिता हाती घेतलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा पालकांनीही स्वीकार केला. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते व इतर खर्च भागविणे अशा अनेक समस्या संस्था चालकांसमोर आहेत. शासनाकडे वारंवार ‘आरटीई’द्वारे प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीबद्दल मागणी करण्यात आली, जेणेकरून त्यातून काही खर्च भागवता येईल. मात्र, कोरोनाचे कारण सांगत संस्थाचालकांच्या पदरी निराशाच पडली, शिवाय मधेच कोणीतरी पालक समाजकंटकांना सोबत घेऊन शाळेला धमकवण्याचे काम करतात. शासन यंत्रणेकडे खोटेनाटे कागदपत्र सादर करून धमकावले जाते. एका शाळेची फी बुडवून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतात व कोणतीही शाहनिशा न करता, इतर शाळाही मुलांना प्रवेश देत असल्यामुळे फी बुडविण्याची वाढलेली वृत्ती अशा सर्व समस्यांमुळे संस्था, शाळा कशा चालवायच्या, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शासनाने संस्था, शाळांच्या समस्या लक्षात घेऊन योग्य ते मार्गदर्शन करावे.