श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर अपघात : शिक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 02:11 PM2019-01-22T14:11:29+5:302019-01-22T14:12:26+5:30
श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर उड्डाणपुलावर सोमवारी रात्री उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मृत्यू झाला.
श्रीरामपूर : श्रीरामपूर-नेवासे रस्त्यावर उड्डाणपुलावर सोमवारी रात्री उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातात जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा मृत्यू झाला. अपघातामुळे ऊस वाहतूक करणाºया अवजड वाहनांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
मयत शिक्षकाचे नाव अशोक शंकर घाटविसावे (रा.प्रगतीनगर, हरेगावफाटा) असे आहे. ते जिल्हा परिषदेच्या उंदिरगाव येथील शाळेत नोकरीस होते. त्यांच्या अपघाताची माहिती समजताच मोठ्या संख्येने मित्र परिवार व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. सोमवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मुलीसह मोटारसायकलवरून (एम.एच.-१७, एन-६८३६) ते शहरात येत होते. त्याचवेळी नेवासेहून दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर (एम.एच.-१६, ए.व्ही.५१४) उड्डाणपुलावरून चालला होता. ट्रॅक्टरचा धक्का लागल्याने घाटविसावे हे त्याखाली सापडले गेले. त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अपघानंतर ट्रॅक्टर चालक फरार झाला. दरम्यान, अपघातावेळी प्रसंगावधान राखत घाटविसावे यांना मुलीला वाचविण्यात यश आले. त्यांनी बाजूला लोटल्याने तिचा प्राण वाचला. शिक्षक घाटविसावे यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊर, चार बहिणी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.