पंढरपूर येथे देवदर्शनासाठी सायकलवर निघालेल्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 15:31 IST2024-07-07T15:30:31+5:302024-07-07T15:31:05+5:30
उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पंढरपूर येथे देवदर्शनासाठी सायकलवर निघालेल्या एका तरुणाचा अपघाती मृत्यू
नागेश सोनवणे, निंबळक (अहमदनगर) : पंढरपूर येथे देव दर्शनासाठी सायकलवर निघालेले कानीफनाथ कोतकर ( राहणार -निंबळक वय ३७ ) यांना पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक गाडीने धडक मारल्याने ते जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी( दि.६ ) कुरकुंभ परीसरात घडली.
नगर एमआयडीसी येथील स्नायडर कंपनीमधील शंभर कामगार तसेच सायकलिंग ग्रुपचे तरूण पंढरपूर येथे दर्शनासाठी पहाटे पाच वाजता नगरहून सायकलवर चालले होते. कुरकुंभ परिसराजवळ जात असताना मालवाहतूक गाडीने पाठीमागून जोराचा धक्का कानीफनाथ कोतकर यांना दिला. ते जागेवर खाली पडले. डोक्याला मार लागला. उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले. मात्र त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोतकर हे स्नायडर कंपनीमध्ये उच्चपदावर काम करत होते. निंबळक येथील सेवा सोसायटीच्या संचालिका ज्योती कोतकर यांचे ते पती होते. त्यांच्या पश्चात आई ,पत्नी, दोन मुली, भाऊ असा परीवार आहे.
दरम्हेयान, ल्मेट रिफलेक्टर व सर्व वाहतुकीचे नियम पाळून ते चालले होते. मात्र हा दुर्दैवी अपघात झाला.