Ahmednagar: अमित सातपुते यांचे अपघाती निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 11:29 PM2023-10-22T23:29:43+5:302023-10-22T23:30:24+5:30

Ahmednagar: नेवासा- शेवगाव राज्य मार्गावरील भेंडा (ता. नेवासा) येथे व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर दोन वाहनांचा अपघात झाला. यात दुचाकीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा) यांचे निधन झाले.

Accidental death of Amit Satpute | Ahmednagar: अमित सातपुते यांचे अपघाती निधन

Ahmednagar: अमित सातपुते यांचे अपघाती निधन

भेंडा (जि. अहमदनगर) : नेवासा- शेवगाव राज्य मार्गावरील भेंडा (ता. नेवासा) येथे व्यंकटेश ज्वेलर्स दुकानासमोर दोन वाहनांचा अपघात झाला. यात दुचाकीवरील अमित बन्सी सातपुते (वय ३३, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा) यांचे निधन झाले. ही घटना रविवारी (दि.२२) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली.

मयत अमित हा काॅम्रेड बन्सी सातपुते, काॅम्रेड स्मिता पानसरे यांचा एकुलता एक मुलगा, तर ज्येष्ठ विचारवंत दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा नातू होता. रविवारी रात्री अमित सातपुते हे नेवासा- शेवगाव राज्य मार्गावरून दुचाकीवरून नजीक चिंचोली येथून नेवासा फाटा येथे येत होते. भेंडा येथे त्यांना एका वाहनाने धडक दिली. अमितच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर पोलिसांनी एका ट्रॅक्टरचालकास पकडले. ट्रॅक्टरचालकाने तरुणाच्या दुचाकीला स्काॅर्पिओने धडक देऊन तो पसार झाल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू केला. दरम्यान, अमित यांचा मृतदेह नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

Web Title: Accidental death of Amit Satpute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.