शिरूरजवळ अपघात : एकाच कुटूंबातील चार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:47 PM2019-04-21T18:47:15+5:302019-04-21T18:47:55+5:30

नगर पुणे महामाार्गावर शिरुर जवळील बाह्यमार्गावर पहाटे चारच्या सुमारास झालेल्या कार व कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यु झाला.

Accidents near Shirur: Four killed in a single family | शिरूरजवळ अपघात : एकाच कुटूंबातील चार ठार

शिरूरजवळ अपघात : एकाच कुटूंबातील चार ठार

देवदैठण : नगर पुणे महामाार्गावर शिरुर जवळील बाह्यमार्गावर पहाटे चारच्या सुमारास झालेल्या कार व कंटेनरच्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यु झाला. मृतांमध्ये दोन सख्या भावांसह आई व २० दिवसांच्या नवजात बालकाचा समावेश आहे. आश्चर्यकारक बचावलेली मुलगी अन घटनास्थळावरील दृश्य पोलीसांसह अनेकांचे मन हेलावुन टाकणारे होते.
नगर - पुणे महामार्गावर शिरुर नजीक (दि.२१) रोजी पहाटे चारच्या सुमारास रस्त्यावर बंद पडलेल्या मालवाहु कंटेनर(आर.जे.०५ जी.बी.२४३३) ला कार (एम.एच.१२ क्यु. डब्ल्यु ८५०२) पाठीमागून धडकली. रस्त्यावर अपघात झाल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. अपघातात किशोर माधव हाके (वय.३२), लिंबाजी उर्फ शुभम माधव हाके (वय.२५), विमलबाई माधव हाके (वय.६०) तसेच २० दिवसाचे नवजात बालक (सर्व सध्या रा.रायसोनि कॉलेज पाठीमागे,वाघोली,पुणे, मुळ रा.रामतिर्थ ता.लोहा, जि.नांदेड) यांचा जागीच दुदैर्वी मृत्यु झाला. तर पुष्पा किशोर हके(वय.२५) या जखमी झाल्या असुन त्यांच्यावर शिरूर येथे उपचार सुरु असुन प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कंटेनर मधील डिझेल संपल्याने कंटेनर रस्त्यावर बंद पडला होता, अशी माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यासह पोलीस कर्मचारी जनार्दन शेळके, रविंद्र पाटमास, कृष्णा व्यवहारे, संजय जाधव, उमेश भगत, करणसिंग जारवाल, हेमंत शिंदे, अभिषेक ओहोळ, सुरेश नागलोथ, गजानन जाधव यांसह स्थानिक नागरिकांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. अपघाताची खबर रमेश चौधरी यांनी दिली.

देव तारी त्याला कोण मारी
औरंगाबाद येथे किशोर हाके यांना मुलगा झाला होता. बायकोला व मुलाला पुन्हा सध्या राहत असलेल्या ठिकाणी वाघोली येथे घेउन येण्यासाठी किशोर, शुभम, त्यांची आई विमलबाई, लहान भाची हे औरंगाबाद ला गेले होते. औरंगाबाद येथुन राञी कारने किशोरची पत्नी व नवजात बाळ यांना घेउन कुटुंबिय पुन्हा वाघोलीकडे येत होते. दरम्यान शिरुर जवळच काळाने त्यांच्यावर झडप घातली. कंटेनर व कारमध्ये झालेल्या अपघाताची तिव्रता इतकी होती कि कारचा चक्काचुर झाला. माञ कार मध्ये असलेली बजरंग हलगुडे हि चार वर्षांची मुलगी सुदैवाने वाचली. अपघातात वाचलेल्या समृद्धी हिला किरकोळ जखम वगळता फारसे लागले नाही.अपघात झाल्यानंतर कार मध्ये अडकलेल्या समृद्धीला बाहेर काढल्यानंतर नातेवाईक येइपर्यंत शिरुर पोलीस स्टेशनला ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात शिरुर पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचारी पोलीस नाईक उषा अनारसे, विद्या बनकर, मोनिका जाधव, रेश्मा गाडगे, शितळ गवळी यांनी त्या मुलीचा सांभाळ केला. यावेळी वाचलेली चार वर्षांची मुलगी जखमी पुष्पा हाके व एकाच कुटुंबातील मयत चार व्यक्ती हे दृश्य पाहुन अनेकांना भावना आवरता येत नव्हत्या.

Web Title: Accidents near Shirur: Four killed in a single family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.