तुळजापूर येथे जाणा-या भाविकांच्या वाहनाला अपघात : चालक ठार, सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:24 PM2019-05-21T12:24:22+5:302019-05-21T12:25:31+5:30
तुळजापूर येथे दर्शनासाठी जाणा-या आंबेगाव, जुन्नर (पुणे जिल्हा) येथील भाविकांच्या वाहनाला जामखेड येथील हिंदुस्थान टायर दुकानासमोर मंगळवारी पहाटे अपघात झाला.
जामखेड : तुळजापूर येथे दर्शनासाठी जाणा-या आंबेगाव, जुन्नर (पुणे जिल्हा) येथील भाविकांच्या वाहनाला जामखेड येथील हिंदुस्थान टायर दुकानासमोर मंगळवारी पहाटे अपघात झाला. पहाटे साडेचारच्या सुमारास वाहन पलटी झाल्याने चालक जागीच ठार तर वाहनातील इतर सात जण जखमी झाले आहेत.
पुणे जिल्ह्यातील चास आणि धनगरवाडी (आंबेगाव, ता-जुन्नर) येथून तुळजापूर दर्शनासाठी क्रूजर (एम.एच.-१४, ईयु-६४५०) या वाहनातून जात असताना जामखेड शिवारातील हिंदुस्तान टायर समोर क्रुझर वाहनाच्या तीन पलटी होऊन चालक धर्मेंद्र कोंडाजी कसबे (वय ३५, नारायणगाव ,जि. पुणे) हा जागीच ठार झाला. मंगलबाई कचरू बारवे (वय ५१ चास, नारोडी, ता. आंबेगाव, जि. पुणे), गिताबाई खंडू कडणे (वय ५५, चास नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे), मच्छिंद्र गेणुभाऊ कदम (वय ४५, चास, नारोडी ता. आंबेगाव जि. पुणे), शंकर दत्तात्रय कदम (वय २६ मुंबई, ओंकार मच्छिंद्र कदम (वय २० चास, आंबेगाव), हौसाबाई झांबड नवले (वय ५५, खेड, जि. पुणे), वैशाली मच्छिंद्र कदम चास (वय ३५, चास, आंबेगाव जि. पुणे) हे जखमी झाले आहेत.
वाहन पलटी झाल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आसपासचे लोक जमा झाले. त्यांनी १०८ वाहनाला फोन करून बोलवले जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींना हातपाय व डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, सुनिल गंडाळ यांनी उपचार केले.