आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न; जामीन होत नसल्याने चमच्याने स्वत:चे फाडले पोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 01:06 PM2020-06-17T13:06:55+5:302020-06-17T13:07:46+5:30
राहुरी पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वृद्ध आरोपीने जामीन होत नसल्याने चमचाने स्वत:चे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे (दि़ १६) ही घटना घडली.
राहुरी : राहुरी पोलीस ठाण्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या वृद्ध आरोपीने जामीन होत नसल्याने चमचाने स्वत:चे पोट फाडून कोठडीतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी पहाटे (दि़ १६) ही घटना घडली.
गणपत भाऊराव तुपे (वय ७५, रा. वांबोरी) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात गणपत तुपे हा ८ एप्रिल २०२० पासून न्यायालयीन कोठडीत आहे. दिनांक १६ जून रोजी पहाटे चार वाजेदरम्यान सहाय्यक फौजदार सुरेश बनसोडे, महिला पोलीस शिपाई मंजूश्री गुंजाळ, पोलीस नाईक शिवाजी खरात, सोमनाथ जायभाये आदी पोलीस कर्मचाºयांची गार्डरुमला ड्युटी होती.
यावेळी तुपे याने स्टीलच्या चमचाने स्वत:च्या पोटावर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर घटना पोलीस कर्मचाºयांना समजताच त्यांनी तुपे याला कोठडीतून बाहेर काढले आणि खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात हलविले.
तहसीलदार फसिओद्दीन शेख, पोलीस निरीक्षक मुकुं द देशमुख यांनी त्याची चौकशी केली असता दोन महिन्यांपासून जामीन होत नाही. तसेच कोणीही नातेवाईक भेटायला आले नाही. त्यामुळे निराश होऊन मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तुपे याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले़ तुपे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.