मोहटा प्रकरणातील आरोपीच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:24 AM2021-05-25T04:24:06+5:302021-05-25T04:24:06+5:30

अहमदनगर : अंधश्रद्धेतून मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी पुरुषोत्तम शशिकांत रोडी याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ...

Of the accused in the Mohta case | मोहटा प्रकरणातील आरोपीच्या

मोहटा प्रकरणातील आरोपीच्या

अहमदनगर : अंधश्रद्धेतून मोहटादेवी मंदिरात सोने पुरल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी पुरुषोत्तम शशिकांत रोडी याच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली आहे.

रोडी याला पोलिसांनी १९ मे रोजी पाथर्डी येथून अटक केली होती. न्यायालयाने त्याला २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला होता. सोमवारी त्याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले. तपासात पोलिसांना रोडी याच्या घरातून गुन्ह्याच्यासंबंधी महत्त्वपूर्ण कागदपत्रे मिळाली असून, पुढील तपासासाठी आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी यावेळी सरकारी पक्षाच्यावतीने करण्यात आली. न्यायालयाने २६ मे पर्यंत आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. चव्हाण यांनी बाजू मांडली

मोहटादेवी मंदिरात सोने पुरले तेव्हा रोडी हा मोहटादेवी ट्रस्टचा लेखापाल म्हणून कार्यरत होता. सोलापूरचा पंडित प्रदीप जाधव याने सुवर्ण यंत्रे बसविण्यासाठी घेतलेल्या १८९० ग्रॅम सोन्यापैकी कमिशन म्हणून रोडी याला २९० ग्रॅम सोने देण्यात आले होते. ही बाब पोलीस तपासात समोर आल्यानंतर रोडी याला अटक करण्यात आली.

Web Title: Of the accused in the Mohta case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.