खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बसस्थानकात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:24 AM2021-09-22T04:24:18+5:302021-09-22T04:24:18+5:30

नामदेव केशव दराडे (वय ३० रा. गोळेगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १९ सप्टेंबर रोजी ...

Accused of murder arrested at bus stand | खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बसस्थानकात जेरबंद

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी बसस्थानकात जेरबंद

नामदेव केशव दराडे (वय ३० रा. गोळेगाव ता. शेवगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने १९ सप्टेंबर रोजी मध्यरात्री क्षुल्लक कारणातून झालेल्या वादात हॉटेलमधील वेटर सोनू नारायण छत्री (वय २७ रा. जोडवाडी ता. गेवराई जि. बडी) याच्या डोक्यात पहार घालून त्याचा खून केला होता. या घटनेनंतर दराडे हा फरार झाला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, उपनिरीक्षक सोपान गोरे, हेड कॉन्स्टेबल विश्वास बेरड, दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, सुनील चव्हाण, पोलीस नाईक दीपक शिंदे, शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सागर ससाणे, शिवाजी ढाकणे, रवींद्र घुंगासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Accused of murder arrested at bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.