बेलवंडी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मोक्काअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीची जामिनावर मुक्तता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 12:27 PM2021-12-04T12:27:21+5:302021-12-04T12:29:29+5:30
श्रीगोंदा: बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र उशीरा दाखल दाखल केले यामुळे श्रीगोंदा न्यायालयाने मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी चेतन कदम आरोपी चेतन काळूराम कदम रा देवदैठण याची जामीनावर मुक्तता केली अशी माहिती समजली आहे या प्रकरणाची पोलिस उपाधीक्षक न्यायालयीन माहिती घेऊन कारवाई करणार आहेत
श्रीगोंदा : बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात आरोपपत्र उशीरा दाखल दाखल केले यामुळे श्रीगोंदा न्यायालयाने मोक्का अंतर्गत कारवाई झालेला आरोपी चेतन कदम आरोपी चेतन काळूराम कदम रा देवदैठण याची जामीनावर मुक्तता केली अशी माहिती समजली आहे या प्रकरणाची पोलिस उपाधीक्षक न्यायालयीन माहिती घेऊन कारवाई करणार आहेत
बेलवंडी पोलिसांनी दिनांक 02/09 /2021 रोजी भारतीय दंड विधान कलम 326 प्रमाणे बेलवंडी पोलीसांनी चेतन कदम त्यांचा एका साथीदारास अटक केली होती .
त्यानंतर संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या संतोष राघू शिंदे चंदू बबन घावटे राजेंद्र बबन ढवळे रा राजापुर ता श्रीगोंदा चेतन काळूराम कदम सागर विनोद ससाणे रा देवदैठण ता श्रीगोंदा राजेंद्र ऊर्फ मधुकर राजेंद्र उबाळे रा कुरुंद ता पारनेर यांचेवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे गुन्हेगारी विश्वात चांगलाच हादरा बसला होता
त्या अगोदर चेतन कदम व सागर ससाणे यांना बेलवंडी पोलीसांनी अटक केली होती
मात्र बेलवंडी पोलीसांनी न्यायालयात मुदतीत आरोपपत्र सादर न केल्याने मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या चेतन कदम ची ३० हजार किमंतीच्याजामीनावर न्यायालयाने मुक्तता केली आहे
आरोपीच्या वतीने अँड.अनिकेत भोसले अँड. संग्राम देशमुख यांनी काम पाहिले.
----
तर निलंबित करणार..
मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या आरोपीस न्यायालयाने जामीन कशाच्या आधारे मंजुर केला याची न्यायालयाकडून सुरुवातीला माहिती घेणार आहे या आदेशाच्या आरोपीचे आरोपपत्र उशीरा आले असे नमुद असेल संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांस निलंबीत करावे असा अहवाल पाठवणार आहे एक दिवस उशीरा आरोपपत्र न्यायालयात दाखल केले अशी प्रथम दर्शनी माहिती आहे.
आण्णासाहेब जाधव पोलिस उपाधीक्षक कर्जत