एटीएम क्लोन करून पैसे चोरणारे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:19 AM2021-05-16T04:19:44+5:302021-05-16T04:19:44+5:30

सूरज अनिल मिश्रा (वय २३) व धीरज अनिल मिश्रा (वय ३१, दोघे रा. टोकेवाडी, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपींची ...

Accused of stealing money by ATM clone arrested | एटीएम क्लोन करून पैसे चोरणारे आरोपी जेरबंद

एटीएम क्लोन करून पैसे चोरणारे आरोपी जेरबंद

सूरज अनिल मिश्रा (वय २३) व धीरज अनिल मिश्रा (वय ३१, दोघे रा. टोकेवाडी, ठाणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे असून हे दोघे सख्खे भाऊ आहेत. पोलिसांनी या दोघांकडून २ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हे दोघे आरोपी काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील आरणगाव येथील पेट्रोल पंपावर कामाला होते. पेट्रोल भरल्यानंतर ग्राहकांनी एटीएमच्या माध्यमातून पेमेंट दिल्यानंतर हे आरोपी त्यांच्याकडे असलेल्या स्कीमर मशीनच्या माध्यमातून ते एटीएम क्लोन करायचे. तसेच यावेळी ग्राहकाच्या एटीएमचा पिन नंबरही विचारून घ्यायचे. असे बहुतांश एटीएम कार्ड क्लोन केल्यानंतर या दोघांनी पेट्रोल पंपावरील काम सोडून दिले. क्लोन केलेल्या एटीएमचा डाटा वापरून बनावट कार्ड तयार करत आरोपींनी एटीएममधून पैसे काढण्यास सुरुवात केली. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस व सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींचा शोध घेतला. या दोघा आरोपींना टोकेवाडी येथून जेरबंद करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १९ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, सहायक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेडकॉन्स्टेबल योगेश गोसावी, गोविंद गोल्हार पोलीस नाईक उमेश खेडकर, दिगंबर कारखिले, राहुल द्वारके, राहुल गुंडू अभिजीत अरकल, वासुदेव शेलार आदींच्या पथकाने तपास करून आरोपींना जेरबंद केले.

फोटो बाय मेल

ओळी- टीएम क्लोन करून पैसे चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Web Title: Accused of stealing money by ATM clone arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.