हद्दपातील आरोपीस अटक, तीन जिल्ह्यातून केेले होते तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 12:25 IST2021-02-20T12:25:13+5:302021-02-20T12:25:36+5:30
कोपरगाव शहरातील गोकुळनगरी येथील राहुल शिवाजी शिदोरे (वय २१) यास अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातून ९ जानेवारी २०२१ पासून २० महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते.

हद्दपातील आरोपीस अटक, तीन जिल्ह्यातून केेले होते तडीपार
कोपरगाव : शहरातील गोकुळनगरी येथील राहुल शिवाजी शिदोरे (वय २१) यास अहमदनगर, नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातून ९ जानेवारी २०२१ पासून २० महिन्यासाठी हद्दपार करण्यात आले होते.
हद्दपारीचे आदेश असतानाही पोलिसांना शुक्रवारी (दि.१९) राहुल शिदोरे हा कोपरगावात असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती. त्यावर पोलिसांनी त्याला अटक करून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक फौजदार संजय पवार करीत आहेत.