युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:53 PM2018-01-17T16:53:36+5:302018-01-17T16:54:17+5:30

गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.

Acid attack on the woman; Gondagaon incident, two cases filed against them | युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

युवतीवर अ‍ॅसिडसदृश हल्ला; गोंडेगाव येथील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव येथील महाविद्यालयीन युवतीवर अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकण्यात आला. प्रसंगावधान राखत हल्ला चुकवल्याने युवतीला कुठलीही इजा झाली नाही. चितळी-पुणतांबे रस्त्यावर गोंडेगाव शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी दोघा तरुणांचा पोलीस शोध घेत आहेत.
सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गोंडेगाव येथील स्नेहल दिलीप बढे (वय १९) ही युवती मामाकडे पुणतांबे येथे चालली होती. अजय सोपान आमले व जयवंत चंद्रभान फोफसे (दोघेही रा. गोंडेगाव) यांनी दुचाकीवरून येत स्नेहल हिच्या दिशेने अ‍ॅसिडसदृश पदार्थ फेकला. त्यासाठी बल्बचा वापर करण्यात आला. वेळीच बाजूला झाल्याने स्नेहल बचावली व अ‍ॅसिड रस्त्यावर पडले.
दरम्यान, स्नेहल बढे यांनी मागील वर्षी याच आरोपींविरोधात अन्य एका प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तो गुन्हा मागे घेण्यासाठी त्यांनी दबाव आणला. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये गावांत अनेकदा वाद उफाळून आले. ते शेजारीच राहत असल्याने शाब्दीक चकमक होत होती.
सहायक पोलीस उपनिरीक्षक एम. आर. साठे हे या प्रकरणी तपास करत आहेत. आरोपी पसार असून त्यांचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आमले व फोफसे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Web Title: Acid attack on the woman; Gondagaon incident, two cases filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.