अकोलेत चुलता-पुतणीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 06:28 PM2019-07-26T18:28:34+5:302019-07-26T18:30:07+5:30

अकोले तालुक्यातील विठा घाटातील दरीत झाडाच्या एकाच फांदीस तालुक्यातील पाभूळवंडी येथील एकाच कुटुंबातील चुलता व त्याची अल्पवयीन पुतणी या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

 Acolyte stabbed to death in Akole | अकोलेत चुलता-पुतणीची गळफास घेऊन आत्महत्या

अकोलेत चुलता-पुतणीची गळफास घेऊन आत्महत्या

राजूर : अकोले तालुक्यातील विठा घाटातील दरीत झाडाच्या एकाच फांदीस तालुक्यातील पाभूळवंडी येथील एकाच कुटुंबातील चुलता व त्याची अल्पवयीन पुतणी या दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
तालुक्यातील पाभूळवंडी येथील उत्तम गणपत जाधव(३५) व त्याच्या चुलत भावाची मुलगी भारती रामदास जाधव(१७) या दोघांचे मृतदेह विठा घाटातील एका सुबाभळीच्या झाडास लटकलेले होते. या बाबतची बातमी विठा येथील पोलीस पाटील दत्तात्रय भागाजी वाकचौरे यांनी पोलीस ठाण्यात दिली. सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे सहायक फौजदार रावसाहेब कदम,रवींद्र वाकचौरे, किशोर तळपे, दिलीप डगळे व इतरांसह घटनास्थळी दाखल झाले. उंच झाडाच्या फांदीस चादरीचा पट्टा तयार करून या दोघांनी शेजारी शेजारी त्यांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत त्यांना आढळून आले.
मयत भारती दहावीचा पेपर देण्यास मंगळवारी गेली होती. त्यानंतर ती घरी आलीच नसल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजता आपली मुलगी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची तक्रार मयत भारतीची आई अलका रामदास जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर काही वेळातच ही घटना उघडकीस आली. बुधवारपासूनच या परिसरात पाऊस सुरू झाला होता त्यामुळे मृतदेह खोल दरीतील झाडास लटकलेले असल्याने ते काढण्यात अडचणी येत होत्या. स्थानिकांच्या मदतीने बुधवारी रात्री अकराच्या दरम्यान हे मृतदेह घाट रस्त्यावर आणण्यात आले. यानंतर हे दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गुरुवारी सायंकाळपर्यंत शवविच्छेदन काम सुरू होते. यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देणार असल्याचे सहायक फौजदार प्रकाश निमसे यांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदर निमसे करत आहेत.

Web Title:  Acolyte stabbed to death in Akole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.