मोक्कातील खटल्यात आरोपीची निर्दोष मुक्तता; कोपरगाव न्यायालयाने दिला निकाल
By रोहित टेके | Published: May 23, 2023 01:12 PM2023-05-23T13:12:11+5:302023-05-23T13:12:33+5:30
या खटल्यात मुख्य आरोपीच्यावतीने अॅड शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले.
कोपरगाव (जि. अहमदनगर ) : राहाता तालुक्यातील साकुरी येथील हॉटेल बांबु हाउसवार झालेल्या दरोडा प्रकरणात आरोपींवर लागलेला महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे (मोक्का) गुन्हयातुन आरोपीची कोपरगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. दिपक आंबादास पोकळे(रा. साकुरी ता. राहाता जि. अहमदनगर)असे निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्यात मुख्य आरोपीच्यावतीने अॅड शंतनु धोर्डे यांनी कामकाज पाहिले.
राहाता तालुक्यातील साकुरी येथील दिपक आंबादास पोकळे याचेविरुद्ध १९ नोव्हेंबर २०१७ रोजी राहाता पोलीस ठाण्यात मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. या गुन्हयाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी करुन दोषारोपत्र दाखल केले त्याप्रमाणे कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर मोक्का खटल्याचे कामकाज सुरू होते. या खटल्यात फिर्यादी पक्षातर्फे १८ महत्वपूर्व साक्षीदार तपासण्यात आले. परंतु एवढया मोठा खटल्यात सरकार पक्ष कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा शाबीत करु शकले नाही.
कोपरगाव येथील जिल्हा वसत्र न्यायलयासमोर अॅड. शंतनु धोर्डे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिले की, आरोपी दिपक पोकळे याने वरील कलमांतर्गत कोणताही गुन्हा केलेला नाही. तसेच जवळ शस्त्र बाळगुन दरोडा टाकलेला नाही. फिर्यादीने फिर्यादीमध्ये दिलेले मुद्दे व कलम १६४ अंतर्गत दिलेले जबाब यात ब-याच प्रमाणात तफावत आढळत असल्याचे कोर्टाच्या लक्षात आणुन दिले. तर सरकारी पक्षाच्या कोर्टापुढील पुराव्यात व जबाबात व फिर्यादीत मोठया प्रमाणात विसंगती आढळुन आली आहे. ओळख परेड ही झालेली नाही या सर्व प्रकरणात फिर्यादीच्या सांगण्यानुसार तसेच दिलेल्या साक्षीदारांच्या जबाबानुसार घडलेली नाही. घटनास्थळ पंचनामा हा कसा चुकीचा असल्याच्या बाबी कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिल्या.
आरोपींनी बाळगलेले हत्यार त्याच्यापासुन केलेली जप्ती यामध्ये विसंगती कोर्टाच्या लक्षात आणुन दिली. तसेच आरोपींनी संघटीत गुन्हेगारीतुन कोणत्याही प्रकारची स्थावर व जंगम मिळकत मिळविलेली नाही. तसेच घटनेतील मुख्य आरोपी हा घटनास्थळावर नव्हता. त्याने कोणतेही प्रकारचे फिर्यादीप्रमाणे कृत्य केलेले नाही. त्याचा सदर घटनेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग नव्हता. हे अॅड. शंतनु धोर्डे यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.