गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई; दहा जण ताब्यात, ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By शिवाजी पवार | Published: June 22, 2023 03:59 PM2023-06-22T15:59:42+5:302023-06-22T15:59:45+5:30

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Action against village liquor sellers; Ten people detained, 62,000 worth of valuables seized | गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई; दहा जण ताब्यात, ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई; दहा जण ताब्यात, ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्या दहा जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यात ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

आरोपींमध्ये रोहित चव्हाण (वय २२), संपत राऊत (वय ३८),  सुनीता पिंपळे (वय ४५), काकासाहेब कदम (वय ३८), बादल चव्हाण (वय ३५), शकीला मंसुरी, सविता पिंपळे (वय ३० रा. सर्व अशोकनगर), गुलाब मापारी (वय ४२, निपाणीवडगाव), गणेश वायकर (वय १९, वडाळा महादेव), राधाबाई काळे (वडाळा महादेव) यांचा समावेश आहे.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून गावठी दारूचे रसायन तसेच काही साखर कारखान्यांमधील निर्मित देशी दारूचे खोके ताब्यात घेण्यात आले. दारूबंदी कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Action against village liquor sellers; Ten people detained, 62,000 worth of valuables seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.