भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करा : छावा संघटनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:44 AM2019-05-09T10:44:23+5:302019-05-09T10:45:03+5:30

जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.

Action on corrupt offisar | भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करा : छावा संघटनेचे उपोषण

भ्रष्ट अधिका-यांवर कारवाई करा : छावा संघटनेचे उपोषण

अहमदनगर : जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले.
राहाता तालुक्यातील डहाणूकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीतील मेघना रविकांत पठारे व सहावीतील अमित रविकांत पठारे या विद्यार्थ्यांनी शाळेची फी न भरल्याने त्यांना नापास करण्यात आले. तर बेकायदेशीरपणे १८ टक्के व्याज आकारून त्यांच्या कुटुंबीयांकडे पठाणी वसुलीसाठी वारंवार तगादा करून मानसिक त्रास देण्यात आला, तसेच शाळा सोडल्याचा दाखला देण्यास मज्जाव करण्यात आला. पठारे कुटुंबीयांनी या प्रकरणी छावा संघटनेकडे तक्रार करुन न्याय मिळवून देण्याची मागणी केली. याप्रकरणी छावा संघटनेने पाठपुरावा करुन शिक्षण विभागातील कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळविण्यात आले. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. वेळोवेळी उपोषण करण्यात आले. दोन वेगवेगळ्या अधिकाºयांमार्फत शाळेची चौकशी करण्यात आली. दोन्ही अधिकाºयांच्या अहवालात तफावत आढळली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शाळेशी संगनमत करुन चुकीचा अहवाल देणारे भ्रष्ट अधिकारी जी. जे. सोनवणे व आर. एम. पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. वरिष्ठ अधिकाºयांचीही खातेनिहाय चौकशी करावी, तसेच शाळेची मान्यता रद्द करावी, आदी मागण्यांसाठी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, साईनाथ बोराटे, दीपक वर्मा, सुरेखा पठारे, मेघना पठारे, मुस्ताक सय्यद, योगेश खेडके, विलास झरेकर, प्रतिभा झरेकर, मिलिंद कुलकर्णी, शाहीर कान्हू सुंबे, रंजनी ताठे सहभागी झाले आहेत

Web Title: Action on corrupt offisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.