मुख्यालयी न राहणा-या महावितरणच्या अधिकारी, कर्मचा-यांवर कारवाई - संजीव कुमार
By Admin | Published: May 16, 2017 01:30 PM2017-05-16T13:30:23+5:302017-05-16T13:30:23+5:30
राज्यात सध्या अवकाळी पाऊस व वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. अशा काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये,
अ मदनगर - राज्यात सध्या अवकाळी पाऊस व वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. अशा काळात ग्राहकांची गैरसोय होऊ नये, सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. मुख्यालयी न राहणा-या अधिकारी व कर्मचा-यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी दिले. महावितरणच्या वरिष्ठ अधिका-यांसह प्रत्यक्ष परिमंडल स्तरावर काम करणा-या कनिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद करण्याचा उपक्रम महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी सुरू केला आहे. संजीवकुमार दर महिन्याच्या तिस-या सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्मचा-यांशी संवाद साधतात. या उपक्रमांतर्गत आज संवाद साधला. सूचनांचे तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संजीव कुमार यांनी दिले.