पांगरमल दारुकांड प्रकरणी पाच पोलीसांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:15 PM2018-03-22T13:15:37+5:302018-03-22T13:15:55+5:30
पांगरमल दारूकांड घटनेत दोषी आढळून आलेल्या पाच जणांना १५ दिवसांच्या आत म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अहमदनगर : पांगरमल दारूकांड घटनेत दोषी आढळून आलेल्या पाच जणांना १५ दिवसांच्या आत म्हणणे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र गायकवाड (सध्या नेमणूक जामखेड पोलीस ठाणे) व पोलीस नाईक शब्बीर शेख (सुपा पोलीस ठाणे) यांना पोलीस खात्यातून काढून टाकण्याची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल भानुदास बांदल (पोलीस मुख्यालय), आदिनाथ गांधले (पोलीस मुख्यालय), राजेंद्र गर्गे (तोफखाना पोलीस ठाणे) यांना तीन वर्षासाठी देय वेतनवाढ रोखण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पांगमरल प्रकरणासंदर्भात कोणते पोलीस अधिकारी व कर्मचारी दोषी आहेत यासाठी चौकशी समिती नियुक्ती करण्यात आली होती. या चौकशीचा अहवाल मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना सादर करण्यात आला आहे. पांगरमल प्रकरण घडले तेव्हा शब्बीर शेख हे तोफखाना पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेत कार्यरत होते.