बेकायदा शिक्षक भरती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:15 AM2021-06-30T04:15:06+5:302021-06-30T04:15:06+5:30

अहमदनगर : राज्यामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवत्ताधारक हजारो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात आहेत. गुणवत्ताधारक प्राधान्यक्रम असलेले शिक्षक भरतीच्या ...

Action should be taken against the institutions which recruit teachers illegally | बेकायदा शिक्षक भरती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी

बेकायदा शिक्षक भरती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करावी

अहमदनगर : राज्यामध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले गुणवत्ताधारक हजारो बेरोजगार युवक नोकरीच्या शोधात आहेत. गुणवत्ताधारक प्राधान्यक्रम असलेले शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत, अशा परीक्षा पुन्हा घेऊन प्रतीक्षा यादी तयार करावी. बेकायदेशीरपणे शिक्षकांची भरती करणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनाचे राज्य सरचिटणीस अशोक सब्बन यांनी शासनाकडे केली आहे.

या पत्रकात म्हटले आहे की, शासनाने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा सक्तीची केली. ती परीक्षा उत्तीर्ण असणारेच गुणवत्ता धारक उमेदवाराची प्रतीक्षा यादी करून पारदर्शकपणे त्यांनाच शिक्षकांच्या पदावर सामावून घेणार होते. पण, प्रत्यक्षात मात्र मागच्या झालेल्या टीईटी

परीक्षेमधील उत्तीर्ण झालेल्या अगदी नगण्य युवकांनाच नोकऱ्या मिळाल्या आहेत. २०१२पासून संस्थांना शिक्षक भरती करण्यास मनाई करण्यात आली आहे. असे असताना राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी पळवाटा काढून बेकायदशीरपणे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून भरती केली. त्यामुळे परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील अनेक शिक्षण संस्थांनी शिक्षक भरती ही टीईटी व केंद्रीय पध्दतीने असतानाही ते नियम डावलले आहेत. संपूर्ण खोटे रेकॉर्ड तयार करून, ९वी व १०वीच्या वर्गाला शिकवण्यासाठी जागा भरल्या आहेत.

--

जिल्ह्यात सातशे शिक्षकांची भरती

शासन व संस्था चालकांनी मनमानी पध्दतीने आपल्या मर्जीतील, आर्थिक भ्रष्टाचार करून अहमदनगर जिल्ह्यांमध्ये सुमारे सातशेपेक्षा जादा शिक्षकांच्या जागा भरल्या आहेत. सध्या अजूनही भरती सुरू आहे. परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी संघटित होऊन हा लढा आपल्या हक्क व अधिकारासाठी देणे आवश्यक आहे. बेकायदा शिक्षक भरती केलेल्या शिक्षण संस्था व शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या विरोधात कडक कारवाई होण्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे.

Web Title: Action should be taken against the institutions which recruit teachers illegally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.