बेशिस्त मंडळांवर कारवाई होणार
By Admin | Published: August 27, 2014 10:45 PM2014-08-27T22:45:22+5:302014-08-27T23:08:23+5:30
नेवासा :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथे गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
नेवासा :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नेवासा येथे गणेश तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या.
गणेशोत्सव काळात गैरवर्तन करणारांची गय केली जाणार नाही, असा इशारा नेवासा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश शिंदे यांनी दिला.
कार्यकर्त्यांना सूचना
ते म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त पोलीस प्रशासनाने लागू केलेली आचारसंहिता गणेश मंडळांना बंधनकारक आहे. मंडळ नोंदणीकृत असावे, गणपतीची वर्गणी देणगीदारांकडून स्वच्छेने दिलेली असावी. बळजबरीने वर्गणी वसूल करणे कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे. रस्त्यात अडवून वाहन चालकांकडून वर्गणी जबरदस्तीने घेऊ नये, रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी गणेशाची स्थापना टाळावी, उत्सवातील देखावे आक्षेपार्ह नसावेत, ते राष्ट्रप्रेम व बंधूभाव प्रेम व माणुसकीचा संदेश देणारे असावेत, असे त्यांनी सूचित केले.
आवाजावर मर्यादा
गणेशमूर्तीच्या संरक्षणाची जबाबदारी गणेश मंडळातील सेवकाने २४ तास करावी, भक्तीमय गीते लावून आवाजही मर्यादीत ठेवावा, जुगार खेळतांना आढळल्यास कडक कारवाईचा इशाराही शिंदे यांनी दिला.
कार्यकर्त्यांचे शंकानिरसन
यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काही
प्रश्न उपस्थित केले. त्याचे निरसन पोलिसांनी केले.
बैठकीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय सरवदे, सुनील शिरसाठ तसेच मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.
(तालुका प्रतिनिधी)