कार्यकर्ते गळ्यात पट्टा घातल्यासारखे वागतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:42+5:302021-04-25T04:19:42+5:30
असतात. जिल्हा, तालुक्यातील पुढारी शेपूट घालून त्यांच्यासमोर गळ्यात पट्टा घातल्यासारखे वागतात. ही वस्तुस्थिती आहे. कार्यकर्ते, ठेकेदार, लाभार्थी हे ...
असतात. जिल्हा, तालुक्यातील पुढारी शेपूट घालून त्यांच्यासमोर गळ्यात पट्टा
घातल्यासारखे वागतात. ही वस्तुस्थिती आहे. कार्यकर्ते, ठेकेदार, लाभार्थी हे सहकाराच्या तुकड्यासाठी लाचार झाले आहेत, अशी टीका संगमनेर
तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील ज्येष्ठ कार्यकर्ते, अहमदनगर जिल्हा
काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी केली. अकोलेत न भीता
सत्य सांगणारे कार्यकर्ते जिवंत असल्याचे पाहून आनंद वाटला, असेही ते
म्हणाले. देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सध्या काँग्रेसवाले ज्या पक्षाच्या नावाने उड्या मारून सत्तेचा वापर करतात त्या पक्षाच्या संस्थापक दिवंगत इंदिरा गांधी या सुद्धा कार्यकर्त्याने जनतेचे प्रश्न न भीता मंत्र्यांपुढे मांडावेत, असे जाहीररीत्या सांगत असत. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्याही सूचना तशाच असायच्या. बी. जे. खताळ पाटील मंत्री असताना बाजू मांडण्याची पहिली संधी कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉम्रेड पी. बी. कडू पाटील, कॉम्रेड राम नागरे, कॉम्रेड पंढरीनाथ सहाणे मास्तर यांना असायची. मात्र दुर्देवाने संगमनेरात स्वत:ला वेगवेगळ्या पक्षांचे लेबल लावणारे बहुतेक कार्यकर्ते मुर्दाड झाले आहेत. राष्ट्रवादीचे रवि मालुंजकर यांनी कोरोनामुळे मरणाऱ्यांची व्यथा मंत्र्यांपुढे मांडली. ती साखर कारखान्याची बैठक नव्हती. मग याचा एवढा गदारोळ कशासाठी? असा सवालही देशमुख यांनी केला.