कोपरगावात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आ. आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 09:56 PM2023-08-15T21:56:53+5:302023-08-15T22:00:09+5:30

Ahmednagar: पारंपारिक राजकीय विरोधक तरीही  समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले.

Activists of BJP and NCP clashed in Kopargaon. Hamritumari in front of Ashutosh Kale and Vivek Kolhe | कोपरगावात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आ. आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी 

कोपरगावात भाजप व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले, आ. आशुतोष काळे व विवेक कोल्हे यांच्यासमोरच हमरीतुमरी 

कोपरगाव - पारंपारिक राजकीय विरोधक तरीही  समंजस राजकारणी म्हणून कोपरगावचे काळे- कोल्हे घराणे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. परंतु याच काळे- कोल्हेंची तिसरी पिढी स्वातंत्र्यदिनी एकमेकांसमोर दंड थोपटून उभी राहिल्याचे चित्र पहावयास मिळाले. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघेही सत्तेत असले तरीही त्यांचे कार्यकर्ते मंगळवारी एकमेकांवर धावून जात होते. त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम त्यांचेच नेते आ. आशुतोष काळे व शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे करीत होते. 

कोपरगाव शहराजवळील गवारे नगर ते ड्रीम सिटी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे भूमिपूजन स्वातंत्र्यदिनी करण्याचे नियोजन काळे-कोल्हे या दोन्ही राजकीय नेत्यांनी करण्याचे ठरविले. विशेष रस्ते अनुदान निधीतून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. कोल्हे गटाचे म्हणणे होते की, हे काम माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात मंजूर झाले आहे. तर विद्यमान आमदार अशितोष काळे यांच्या कार्यकर्त्यांचा काळे यांनीच त्या कामासाठी निधी मंजूर करून आणला असा दावा होता. 

भारतीय जनता पक्षाचे युवा नेते, संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी एक फलक लावला. त्यावर उद्घाटक म्हणून स्थानिक ज्येष्ठ नागरिक असा मजकूर होता. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या फलकासमोरच आमदार अशितोष काळे भूमिपूजन करणार असल्याचा फलक लावला. रस्त्याचे भूमिपूजन काळे यांच्या हस्ते झालेही. त्याच वेळी भाजपचे कार्यकर्ते भूमिपूजन स्थळी पोहोचले. त्यांनी आपल्या पक्षाचा फलक झाकल्या जात असल्याचा आरोप करीत त्या ठिकाणी गोंधळ घातला. दोन्ही कार्यकर्ते एकमेकांवर धावून जात होते. काही काही वेळातच आशुतोष काळे व विवेक कोल्हे घटनास्थळी पोहोचले. नेते आल्यानंतर कार्यकर्त्यांना स्फुरण चढले. प्रचंड घोषणाबाजी, एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोप होत राहिले. उत्साही कार्यकर्ते आपापल्या नेत्याला खांद्यावर उचलून घेत त्यांचा जयघोष करीत होते, तर काही एकमेकांवर आरोप करीत राहिले.

घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले हे फौज फाट्यासह दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगविण्याचाही प्रयत्न केला परंतु, राज्याच्या सत्तेतच असलेल्या दोन्ही दिग्गज नेत्यांना तणावाची परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका अशी म्हणण्याची हिंमत कोणातही झाली नाही. कार्यकर्त्यांचा उत्साह वाढतच गेला. हमरीतुमची, एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल होत राहीली. तीन तास परिसरातील वातावरण तणावपूर्ण होत राहीले. घटनास्थळ कोण सोडेल त्याची माघार, असा समज नेत्यांनीही करून घेतला. दोघेही जागचे हटेनात. शेवटी प्रशासनाने दोघांनाही विनंती केली, त्यानंतर दोन्ही नेत्यांनी घटनास्थळ सोडले.

दोन्ही फलक काढले 
आमदार आशुतोष काळे व व विवेक कोल्हे घटनास्थळावरून निघून गेल्यानंतर नगरपालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दोन्ही फलक काढून घेण्याचे सुचित केले. काही वेळातच दोन्ही फलक कर्मचाऱ्यांनी काढून घेतले.

मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा 
कोपरगाव शहरातील तणावपूर्व परिस्थितीला मुख्याधिकारी शांताराम गोसावी हेच जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली. स्वातंत्र्यदिनी कुठलाही कार्यक्रम घेण्याचे निर्देश नसतानाही भूमिपूजन समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. आम्ही लावलेला फलक झाकून त्यासमोरच विरोधकांचा फलक लावण्यात आला. गोसावी हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची भूमिका निभावीत आहेत. शहरातील अनाधिकृत होर्डिंग्सला त्यांचेच अभय आहे. त्यांच्यावरच शांतताभंगाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी विवेक कोल्हे यांनी केली आहे.

Web Title: Activists of BJP and NCP clashed in Kopargaon. Hamritumari in front of Ashutosh Kale and Vivek Kolhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.