विधवा महिलांच्या घरी जाऊन कार्यकर्त्यांनी केले रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:06+5:302021-08-24T04:26:06+5:30
कोरोनाने अकोले तालुक्यात ११० महिलांना वैधव्य आले आहे. या महिलांना आधार देण्यासाठी एकल महिला पुनर्वसन समिती काम करत आहे. ...
कोरोनाने अकोले तालुक्यात ११० महिलांना वैधव्य आले आहे. या महिलांना आधार देण्यासाठी एकल महिला पुनर्वसन समिती काम करत आहे. शहरात कांचन शिंदे यांच्या घरी जाऊन पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय साबळे व समितीचे कार्यकर्ते मनोज गायकवाड, संगीता साळवे, शांताराम गजे, प्रतिमा कुलकर्णी, वसंत मनकर, हेमंत दराडे यांनी रक्षाबंधन केले. संतोष मुतडक यांनी राजूर पोलीस उपनिरीक्षक साबळे यांच्याबरोबर कोहोंडी व केळुंगण या गावी जाऊन महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या व रक्षाबंधन केले. रुंभोडी येथे बाळासाहेब मालुंजकर, रवी मालुंजकर, रमेश सावंत व ग्रामपंचायत सदस्य यांनी भगिनींच्या घरी जाऊन राखी बांधून घेतली. धुमाळवाडी येथे कार्यकर्ते ललित छल्लारे यांच्या रवींद्र गोर्डे, प्रशांत धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी, कोंडीराम चौधरी, विक्रम घोलप, किशोर झोळेकर, किशोर धुमाळ यांनी विधवा महिलांच्या घरी जाऊन रक्षाबंधन केले. ब्राह्मणवाडा येथे संजय गायकर यांनी दोन विधवा भगिनींच्या घरी जाऊन रक्षाबंधन केले.
सोबत फोटो