समाजहितासाठी उपक्रम सुरू ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:23 AM2021-01-16T04:23:17+5:302021-01-16T04:23:17+5:30

महाराष्ट्र माहेश्वरी सभेच्या सहयोगाने संगमनेरात आयोजीत तीन दिवसीय परिचय संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे ...

Activities should be continued for the benefit of the society | समाजहितासाठी उपक्रम सुरू ठेवावा

समाजहितासाठी उपक्रम सुरू ठेवावा

महाराष्ट्र माहेश्वरी सभेच्या सहयोगाने संगमनेरात आयोजीत तीन दिवसीय परिचय संमेलनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्रीकिशन भन्साळी होते. प्रदेश माहेश्वरी सभेच्या परिचय समितीचे प्रमुख श्रीकांत लखोटिया व अहमदनगर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अनीष मणियार प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.

सोनी म्हणाले, बदलत्या काळानुसार जे बदलणार नाहीत ते मागे पडतील. छोट्या शहरांमध्ये देखील कर्तुत्वाला मोठा वाव आहे. याउलट मोठ्या शहरातील जीवन अत्यंत खर्चिक आणि धकाधकीचे झाले आहे. वधू आणि वर यांच्या आवडीनिवडी, छंद, स्वभावगुण, शिक्षण एकमेकाला पूरक आहेत का? इतके पाहिले तरी पुरेसे आहे. खूप चिकित्सा करीत असल्याचे चटके अनेक परिवारांना बसले आहेत.

राजस्थान मंडळाचे अध्यक्ष व मालपाणी उद्योग समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी आपल्या भाषणात परिचय संमेलनामागील सविस्तर भूमिका मांडली. सूत्रसंचालन सुमित आट्टल व उमेश कासट यांनी केले. कल्याण कासट यांनी आभार मानले.

Web Title: Activities should be continued for the benefit of the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.