सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या नगर अपार्टमेंटला आग

By अण्णा नवथर | Published: December 12, 2023 04:31 PM2023-12-12T16:31:50+5:302023-12-12T16:33:16+5:30

सिने अभिनेते सदाशिव आमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटला शॉर्टसर्किटमुेळे मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली.

actor Sadashiv Amarapurkar's Nagar apartment caught fire in Ahmednagar | सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या नगर अपार्टमेंटला आग

सिने अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या नगर अपार्टमेंटला आग

अण्णा नवथर,अहमदनगर: सिने अभिनेते सदाशिव आमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटला शॉर्टसर्किटमुेळे मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कुठलीही जिवीत हानी झाली नाही.

नगर शहरातील धर्माधिकारी मळ्यात सुमन अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटमध्ये सिनेने अभिनेते सदाशिव आमरापूरकर यांच्या मालकीच्या चार सदनिका आहेत. तसेच शहरातील नाट्य कलावंत मकरंद खेर हेदेखील याच अपार्टमेंट राहतात. आमरापूरकर यांच्या मालकीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेत राहत असलेल्या ज्योती पठारे यांना धुराच्या लोळामुळे त्रास झाला. त्यांना तातडीने शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नाट्यकलावंत मकरंद खेर हे स्वत दवाखान्यात गेले होते. त्यांचा मुलगा आनंद हे कंपनीत होते. आनंद यांच्या पत्नी मुलीला शाळेतून आणण्यासाठी गेलेल्या होत्या. त्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुलीला शाळेतून घेऊन घरी आल्या. त्यावेळी त्यांना तळमजल्यावर आग लागल्याचे दिसले. त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना मदत मागविली. दरम्यान या भागातील नगरसेवक रविंद्र बारस्कर यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला ही माहिती दिली. काहीवेळातच अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा केल्याने आग नियंत्रणात आली. महवितरणच्या अधिकाऱ्यांनी अपार्टमेंटचा विज पुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले.

Web Title: actor Sadashiv Amarapurkar's Nagar apartment caught fire in Ahmednagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.