नव्या २०२२ बाधितांची रुग्ण संख्येत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:21 AM2021-04-10T04:21:13+5:302021-04-10T04:21:13+5:30
शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५२७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७९ आणि अँटिजेन चाचणीत ९१६ रुग्ण बाधित आढळले. ...
शुक्रवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५२७, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५७९ आणि अँटिजेन चाचणीत ९१६ रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २३५, अकोले ०२, जामखेड ३०, कर्जत २३, कोपरगाव ४२, नगर ग्रामीण १८, नेवासा ०३, पारनेर ०१, पाथर्डी ५६, राहाता ०२, राहुरी ०३, संगमनेर ३७, श्रीगोंदा १७, श्रीरामपूर २४, कँटोन्मेंट बोर्ड ३० आणि इतर जिल्हा ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १६७, अकोले ४२, जामखेड ०३, कर्जत ३, कोपरगाव ३५, नगर ग्रामीण २५, नेवासा ०८, पारनेर १०, पाथर्डी ०२, राहाता ८८, राहुरी १५, संगमनेर १०९, श्रीगोंदा ०३, श्रीरामपूर ३६, कँटोन्मेंट बोर्ड १८, इतर जिल्हा १३ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत ९१६ जण बाधित आढळून आले. मनपा १२४, अकोले ७६, जामखेड ३७, कर्जत ८८, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण ७०, नेवासा ४३, पारनेर ३२, पाथर्डी ८८, राहाता ४७, राहुरी ६८, संगमनेर २३, शेवगाव ५२, श्रीगोंदा ४०, श्रीरामपूर ५४, कॅन्टोन्मेंट बोर्ड ०९ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
--------
बरे झालेली रुग्ण संख्या:९८२९४
उपचार सुरू असलेले रूग्ण:११८५६
मृत्यू:१२७३
एकूण रूग्ण संख्या:१,११,४२३