जिल्ह्यात ३,७८० नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:21 AM2021-04-25T04:21:10+5:302021-04-25T04:21:10+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ३,२२५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३,७८० ने वाढ झाल्याने ...
अहमदनगर : जिल्ह्यात शनिवारी ३,२२५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ३,७८० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३ हजार ३०२ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पोर्टलवर २४ तासात ५५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९९९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ११०१ आणि अँटिजेन चाचणीत १६८० रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये नगर शहर २०७, अकोले ६४, जामखेड १०७, कर्जत ६१, कोपरगाव ४७, नगर ग्रामीण ३९, नेवासा ४४, पारनेर ८७, पाथर्डी ४६, राहाता ६९, राहुरी ९, संगमनेर ९२, शेवगाव ३७, श्रीगोंदा ६, श्रीरामपूर ४८, कँटोन्मेंट बोर्ड २६ आणि मिलिटरी हॉस्पिटल ८ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ५०१, अकोले ११, जामखेड ३, कर्जत १३, कोपरगाव ११, नगर ग्रामीण १२२, नेवासा १८, पारनेर ५, पाथर्डी २७, राहाता ९७, राहुरी २३, संगमनेर १३३, शेवगाव २१, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ६७, कँटोन्मेंट बोर्ड २७ आणि इतर जिल्हा ११ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज १६८० जण बाधित आढळून आले. नगर शहर २६२, अकोले ४०, जामखेड २८, कर्जत ६३, कोपरगाव ९३, नगर ग्रामीण २१५, नेवासा १८४, पारनेर ९३, पाथर्डी ३५, राहाता १४१, राहुरी १५१, संगमनेर ७२, शेवगाव ८१ श्रीगोंदा १३९, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट बोर्ड २६ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
-----------
कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : १,३०,९३८
उपचार सुरू असलेले रुग्ण : २३,३०२
मृत्यू : १७७६
एकूण रुग्णसंख्या : १,५६,०१६