नवीन ९५३ बाधितांची रुग्ण संख्येत भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:28+5:302021-09-15T04:26:28+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २९३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटिजन चाचणीत २९७ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा ...
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २९३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३६३ आणि अँटिजन चाचणीत २९७ रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १७, अकोले १, जामखेड १७, कर्जत १, कोपरगाव १, नगर ग्रामीण १७, नेवासा ७, पारनेर ४४, पाथर्डी ७१, राहता १, राहुरी १, संगमनेर ५२, शेवगाव १, श्रीगोंदा ५२, कंटोन्मेंट बोर्ड १ आणि इतर जिल्हा ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २०, अकोले १८, जामखेड ७, कर्जत २४, कोपरगाव १५, नगर ग्रा. १०, नेवासा ३५, पारनेर १९, पाथर्डी ४, राहाता ४५, राहुरी ३३, संगमनेर ७३, शेवगाव २८, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १२ आणि इतर जिल्हा ९ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजन चाचणीत २९७ जण बाधित आढळले. त्यात मनपा ४, अकोले ३९, जामखेड ५, कर्जत २७, कोपरगाव ७, नगर ग्रा. १६, नेवासा १७, पारनेर २८, पाथर्डी ३१, राहाता १६, राहुरी १२, संगमनेर ६१, शेवगाव ११, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर ११ आणि इतर जिल्हा २ अशा रुग्णांचा समावेश आहे.
------------
बरे झालेली रुग्ण संख्या : ३,२२,३३८
उपचार सुरू असलेले रुग्ण : ५५७८
पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६६७३
एकूण रुग्ण संख्या : ३,३४,५८९