ऑक्सिजन, औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:20 AM2021-04-06T04:20:03+5:302021-04-06T04:20:03+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न ...

Adequate supply of oxygen, medicines | ऑक्सिजन, औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध

ऑक्सिजन, औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध

अहमदनगर : जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला दिले आहेत. कोविड रुग्णालयाशी संलग्न मेडिकल स्टोअर्समध्ये रेमडेसिवीर विक्रीकरिता उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोविड रुग्णालयांना मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील आणि मागणीप्रमाणे रुग्णालयांना त्याचा पुरवठा होईल, याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अशोक राठोड यांनी दिली आहे.

औषधाची आणि मेडिकल ऑक्सिजनची उपलब्धता होण्याच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शन तसेच उत्पादक, वितरक आणि रुग्णालयाचे प्रतिनिधी यांच्या बाबतचा समन्वय केला जात आहे. त्यासाठी आठवड्याचे सर्व दिवस हे कार्यालय सुरु ठेवण्यात येणार आहेत.

---------

अडीच हजार रुग्णांना इंजेक्शनची गरज

रुग्णालयात कोविड उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांपैकी २ हजार ४१९ रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार २१० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पाच उत्पादक कंपन्यांकडून रुग्णालयाकरिता सोमवारी (दि. ५) २४ मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे. ऑक्सिजनचे वितरण केल्यानंतर देखील २३ मेट्रिक टनचा साठा जिल्ह्यासाठी उपलब्ध असल्याचे राठोड यांनी सांगितले.

Web Title: Adequate supply of oxygen, medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.