आदित्य ठाकरे यांची सभा विनापरवानगी : दोन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 03:22 PM2019-07-23T15:22:49+5:302019-07-23T15:24:34+5:30
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी शहर पोलिसांची कुठलीही परवानगी न घेतल्यामुळे, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी श्रीरामपबर युवा सेनेच्या दोन कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
श्रीरामपूर : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी शहर पोलिसांची कुठलीही परवानगी न घेतल्यामुळे, वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी श्रीरामपबर युवा सेनेच्या दोन कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हवालदार राजू आसाराम मेहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून युवा सेनेचे कार्यकर्ते निखिल अनिल पवार व रंजित सूर्यभान शेळके यांच्याविरूद्ध रस्ता अडवून गैरसोय केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतुकीला अडथळा ठरू शकणाऱ्या व नागरिकांच्या वावराला अडथळा आणणाºया रस्त्यांवरील कार्यक्रमांना सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्याच आधारे श्रीरामपूर शहरात गेल्या अनेक वषार्पासून नावाजलेल्या नवरात्रौत्सवाला परवानगी नाकारण्यात आली होती. शहरातील मंडळांना रस्त्यावर मंडप उभारण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने मोठा गदारोळ झाला होता.
सोमवारच्या युवा सेनेच्या आदित्य ठाकरे यांच्या सभेलाही त्याच आधारे पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मुख्य रस्त्यावर सभा घेण्यात आली. सभेला पर्यावरण मंत्री रामदास कदम, मंत्री विजय शिवतारे, खासदार सदाशिव लोखंडे, संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
सभेसाठी रविवार व सोमवार ही दोन दिवस मुख्य रस्त्यावरील एक बाजू बंद राहिली. मंडप उभारल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. याशिवाय ठाकरे यांना असलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे तसेच झालेल्या गदीर्मुळे संपूर्ण मुख्य रस्ताच सभेवेळी बंद राहिला. त्याविरोधात काहींनी नाराजी व्यक्त केली होती. शहर पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे अधिक तपास करत आहेत.