गोदावरीतील वाळू उपशाविरुद्ध प्रशासनाचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:22 AM2021-02-24T04:22:48+5:302021-02-24T04:22:48+5:30
प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सोमवारी रात्री गोदाकाठावरील मातुलठाण येथे रात्री भेट दिली. ...
प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सोमवारी रात्री गोदाकाठावरील मातुलठाण येथे रात्री भेट दिली. त्यांनी नदीपात्रातून होणाऱ्या वाळू वाहतुकीचे रस्ते खोदण्याचे आदेश दिले. पुन्हा हे रस्ते सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, प्रशासनाने वाळू तस्करी रोखण्यासाठी येथे तपासणी केंद्र उघडले आहे. तेथे महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसीलदार प्रशांत पाटील, तसेच उपअधीक्षक संदीप मिटके हे येथे गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी भेट देत आहेत; मात्र असे असले तरी स्थानिक रहिवाशांकडून मात्र पुरेशी मदत होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
गोदावरीतील वाळूला नगरसह नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातून मोठी मागणी आहे. वैजापूर (जि.औरंगाबाद) येथील प्रशासनाकडून मात्र कारवाई केली जात नसल्याने वाळू तस्करांचा आत्मविश्वास वाढला आहे.
----------