अवैध वाळू वाहतुकीबाबत प्रशासनाचे दुर्लक्ष?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:17 AM2021-05-30T04:17:58+5:302021-05-30T04:17:58+5:30
पुणतांबा-रस्तापूर शिवारातील पडीक तसेच शेती महामंडळाच्या जमिनीवर गोदावरीच्या नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा करून साठे करण्यात येत आहे. या साठ्यातून ...
पुणतांबा-रस्तापूर शिवारातील पडीक तसेच शेती महामंडळाच्या जमिनीवर गोदावरीच्या नदीपात्रातील वाळूचा बेसुमार उपसा करून साठे करण्यात येत आहे. या साठ्यातून मोठ्या प्रमाणात शिर्डी, राहाता, नाशिक येथे मोठ्या डंपरच्या साह्याने वाहतूक होत आहे. ही वाहतूक कोरोना काळात कोणी जिल्ह्यात प्रवेश करू नये म्हणून चेक करणाऱ्या पोलिसांच्या समोर होत असून कोणत्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाही. कायदा फक्त सर्वसामान्यांना भीती दाखवण्याकरिता आहे की काय याचा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
वारंवार गोदावरीच्या पात्रातून होणाऱ्या या अवैध उपसा व वाहतुकीवर आवाज उठवूनही महसूलमंत्र्यांकडून डोळेझाक होते आहे. राहाता, कोपरगाव, सिन्नरच्या तहसीलदारांना निवेदने देऊनही महसूल विभागाकडूनही मोठी कारवाई झाली नसल्याने वाळूमाफियांमध्ये कायद्याची भीती नाही.
...
राहाता तहसीलदार, शिर्डी प्रांताधिकारी, अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदन, मेलद्वारे तक्रार करूनही काही कारवाई होताना दिसत नाही.
- भास्कर मोटकर, शिवसेना उपतालुका प्रमुख, राहाता
......
सध्या कोविडमुळे नागरिकांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले जात आहे. जिथे वाळू साठे आढळतील त्या जागा मालकावर दंडात्मक कारवाई करून साठे जप्त करणार आहे.
-कुंदन हिरे, तहसीलदार, राहाता