अध्यक्षपदी ॲड. मनोहरराव देशमुख, सचिवपदी टी. एन. कानवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:23 AM2021-09-23T04:23:49+5:302021-09-23T04:23:49+5:30
सत्यनिकेतन संस्थेची २०२१ ते २०२८ या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक झाली. पुणे येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी ...
सत्यनिकेतन संस्थेची २०२१ ते २०२८ या कालावधीसाठी विश्वस्त मंडळाची निवडणूक झाली. पुणे येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी या निवडणुकीसाठी पुणे येथील न्यास नोंदणी कार्यालयाच्या निरीक्षक रागिणी खडके यांची नियुक्ती केली होती. अकरा जागांसाठी झालेल्या या निवडणुकीसाठी एकूण १२ उमेदवार उभे होते. यात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड. मनोहरराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सत्यनिकेतन विकास मंडळाचे ११ विश्वस्त निवडून आले, तर भाऊसाहेब मंडलिक यांना पराभव स्वीकारावा लागला. यात संस्थेचे विद्यमान अध्यक्ष ॲड. देशमुख यांना १०० टक्के मते पडली. ॲड. मनोहरराव देशमुख, विवेक मदन, टी. एन. कानवडे, मिलिंद उमराणी, एम. एल. मुठे, प्रकाश टाकळकर, श्रीनिवास एलमामे, प्रकाश शाह, नंदकिशोर बेल्हेकर, विजय पवार आणि श्रीराम पन्हाळे यांची विश्वस्तपदी वर्णी लागली. वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांनी विजयी झालेल्या विश्वस्तांची नावे जाहीर केली.
पुणे येथील निष्णात अभियंता अशोक मिस्त्री आणि मुंबई येथील मुख्य कार्यकारी अधिकारी चिमणराव देशमुख यांची स्वीकृत संचालक म्हणून निवड करण्यात आली. ज्येष्ठ संचालक एम. बी. वाकचौरे, सामाजिक कार्यकर्ते रामजी काठे आणि निवृत्त मुख्याध्यापिका माधवी मुळे यांची कायम निमंत्रित संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.