‘मराठा महासंघाचा महायुतीला फायदा’
By Admin | Published: May 21, 2014 12:11 AM2014-05-21T00:11:43+5:302024-10-23T13:34:20+5:30
अहमदनगर : मराठा महासंघाच्या राजकीय आणि सामाजिक भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा आहे.
अहमदनगर : मराठा महासंघाच्या राजकीय आणि सामाजिक भूमिकेस शिवसेनेचा सदैव पाठिंबा आहे. सेनेचे महासंघाशी असलेले नाते अतूट असल्याने लोकसभा निवडणुकीत महासंघाने सेना-भाजपाच्या युतीला जाहीर पाठिंबा देत, प्रचार केला. याचा महायुतीचा फायदा झाला असल्याचे शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निकालानंतर शिवसेनेचे उपनेते आ. अनिल राठोड, महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजी दहातोंडे यांनी मातोश्रीवर जाऊन सेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ठाकरे म्हणाले की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि महासंघाचे अतूट नाते होते. महासंघाच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीला सेनेचाा सदैव पाठिंबा राहिल. यावेळी आ. राठोड यांनी सांगितले की, महासंघाने राज्यात शेतकर्यांच्या मुलांसाठी मोठी चळवळ उभी केली आहे. नगर जिल्ह्यात याचे श्रेय दहातोंडे यांना जाते. तर दहातोंडे यांनी मराठा समाजातील शेतकर्यांच्या मुलांसाठी महासंघाने चळवळ उभी केली असून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण आणि नोकर्या मिळवून देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण केलेले आहे. (प्रतिनिधी)