४० वर्षानंतर मढीत पोहोचले वांबोरी चारीचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2019 05:06 PM2019-09-13T17:06:49+5:302019-09-13T17:07:06+5:30
अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते.
मढी : अखेर ४० वर्षानंतर मढी (ता. पाथर्डी) येथील ‘टेल’च्या भागात वांबोरी चारीचे पाणी बुधवारी (दि.११) तलावात पोहोचले. याबाबत दैनिक ‘लोकमत’ने विविध वृत्तांमधून प्रशासन, राजकीय पदाधिकाºयांचे लक्ष वेधले होते.
पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील दुष्काळी शेतकºयांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सुटल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुष्काळी पश्चिम भागाला मुळा धरणातून चारीद्वारे पाणी मिळावे म्हणून गेल्या ४० वर्षापासून या भागात मोठी आंदोलने झाली. अनेकांना तुरुंगवास झाला. शासनाने याची दखल घेवून मुळा चारीचे रूपांतर बंद पाईपद्वारे या भागाला पाणी देण्यासाठी पाईप योजना केली. योजना पूर्ण होवून १० वर्ष झाली. मात्र या योजनेला ठेकेदाराने केलेले अपूर्ण काम, योजनेतील त्रुटी, अनाधिकृत कनेक्शन्स यामुळे पाणी आले नाही. मध्यंतरी योजनेच्या ट्रायलच्या दरम्यान एकदा मढी येथे पाणी पोहोचले होते मात्र ते तत्काळ बंद करण्यात आले होते. सलग दोन वर्ष या भागात दुष्काळ पडला. या प्रश्नावर दै. ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच या भागात जनजागृती झाली. पुन्हा वांबोरी चारीचे आंदोलन पेटले. प्रशासन व राज्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आली.
पाटबंधारे विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांच्या अथक परिश्रमामुळे या योजनेच्या ‘टेल’ला असणाºया मढी गावच्या तलावात पाणी नेण्यात यश आले.
मढी, घाटसिरस या भागातील फळबागा दुष्काळामुळे जळाल्या होत्या. पिण्याच्या पाण्याचे संकट वाड्यावस्त्यांवर जाणवत असताना वांबोरी चारीच्या पाण्याने या भागातील शेतकºयांच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर ‘टेल’ला पाणी आल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, असे शेतकरी भगवान मरकड, बबन मरकड यांनी सांगितले.