‘मागण्या मान्य झाल्यावरच दूध आंदोलन मागे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 04:37 AM2018-05-08T04:37:59+5:302018-05-08T04:38:19+5:30
दुधाला सरकारने हमी दिल्याप्रमाणे प्रतिलिटर २७ रुपये भाव द्यावा, दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण आखावे, या मागण्या मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही आणि दूध आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा खुलासा किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे.
अकोले (जि. अहमदनगर) : दुधाला सरकारने हमी दिल्याप्रमाणे प्रतिलिटर २७ रुपये भाव द्यावा, दूध व्यवसायात वारंवार निर्माण होणारे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी पर्यायी दूध धोरण आखावे, या मागण्या मान्य झाल्याशिवाय संघर्ष थांबणार नाही आणि दूध आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा खुलासा किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केला आहे. दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने दूध दरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकारच्या वतीने ६ मे रोजी सायंकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत चर्चेस राज्य सरकारचा निरोप दिला होता. सोमवारी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. संघर्ष समितीने चर्चेच्या प्रस्तावाचे स्वागत केले.