आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्येला जाणार - जरांगे पाटील
By अण्णा नवथर | Published: January 22, 2024 03:54 PM2024-01-22T15:54:08+5:302024-01-22T15:56:07+5:30
काहीजण सांगतात की अयोध्येला जाणार, पण आम्ही कसे जातो, ते पहा आम्ही मोठ्या संख्येने अयोध्या येथे जाऊन रामाचे दर्शन घेणार आहे, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
अहमदनगर :मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्या येथे जाणार असल्याचे मराठा नेते मनोज जडांगे पाटील यांनी भिंगार येथे सोमवारी सांगितले. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा बारबाभळी येथून नगर शहराकडे जात असताना भिंगार येथील राम मंदिरात मराठा नेते जरांगे पाटील यांनी आरती केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की राम मंदिराचा गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. त्याला यश मिळालेले आहे. संपूर्ण देशभर हा उत्सव साजरा केला जात आहे. आयोध्यात राम मंदिर झाले याचा आनंद आहे. काहीजण सांगतात की अयोध्येला जाणार, पण आम्ही कसे जातो, ते पहा आम्ही मोठ्या संख्येने अयोध्या येथे जाऊन रामाचे दर्शन घेणार आहे, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.