दीर्घ कालावधीनंतर मुरकुटे जिल्हा बँकेच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:18 AM2021-02-07T04:18:53+5:302021-02-07T04:18:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क श्रीरामपूर : माजी आमदार भानुदास मुरकुटे हे दीर्घ कालावधीनंतर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ...

After a long time in the arena of Murkute District Bank | दीर्घ कालावधीनंतर मुरकुटे जिल्हा बँकेच्या रिंगणात

दीर्घ कालावधीनंतर मुरकुटे जिल्हा बँकेच्या रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्क

श्रीरामपूर : माजी आमदार भानुदास मुरकुटे हे दीर्घ कालावधीनंतर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. २००२ ते २००७ या दरम्यान बँकेचे संचालक राहिलेल्या मुरकुटे यांनी सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मुरकुटे यांचे भाजप नेते राधाकृष्ण विखे यांच्याशी सख्य वाढले आहे. त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविल्यास विद्यमान संचालक व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक करण ससाणे यांच्याशी त्यांचा थेट सामना रंगणार आहे.

श्रीरामपुरातून बँकेच्या निवडणुकीसाठी भानुदास मुरकुटे, करण ससाणे तसेच भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे समर्थक माजी सभापती दीपक पटारे यांनी अर्ज दाखल केले आहेत. मुरकुटे समर्थक कोंडीराम उंडे यांचाही सेवा संस्था मतदारसंघातून अर्ज आहे. मुरकुटे यांनी शेतीपूरक व बिगर शेती मतदारसंघातील अर्ज शुक्रवारी मागे घेतले. ससाणे यांचादेखील ओबीसी मतदारसंघातून अर्ज दाखल झालेला आहे.

मुरकुटे हे अशोक साखर कारखान्याचे सूत्रधार आहेत. कारखान्याला पूर्वी राज्य सहकारी बँकेकडून पतपुरवठा केला जात होता. मात्र चालू गाळप हंगामासाठी अशोकने जिल्हा बँकेकडून कर्ज उचलेले आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी केवळ माघारीकरिता ते अर्ज दाखल करतील अशी शक्यता नव्हती. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवरून कुतूहल वाढले होते. सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे तसेच उमेदवारीसंदर्भात राज्यातील कोणत्याही मोठ्या नेत्याशी चर्चा केलेली नाही, असे त्यांनी लोकमतला सांगितले.

मुरकुटे हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणार की भाजपची साथ करणार हे गुलदस्त्यात आहे. त्यांनी भाजपकडून उमेदवारी केल्यास विखे समर्थक दीपक पटारे हे त्यांच्याकरिता अर्ज माघारी घेणार का, हे पाहावे लागेल. महसूलमंत्री थोरात यांनी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी मागील महिन्यात बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला करण ससाणे हे उपस्थित होते. थोरात यांच्याच आदेशावरून ससाणे यांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे मुरकुटे विरुद्ध ससाणे लढतीची शक्यता आहे.

---------

पळवापळवी नाही

निवडणुकीसाठी ११ फेब्रवारीला अर्ज माघार, तर २० रोजी मतदान होत आहे. अवघ्या १५ दिवसांवर मतदान येऊन ठेपले असताना येथे अजूनही उमेदवारांच्या भेटीगाठींनी जोर पकडलेला नाही. सेवा संस्था मतदारसंघातून ६९ मतदार आहेत. राजकीय बलाबल पाहता संघर्षपूर्ण लढत होणार आहे. कोणाकडेही स्पष्ट कौल नाही. मात्र तरीही मागील निवडणुकांप्रमाणे यंदा मतदारांची पळवापळवी झालेली दिसत नाही.

------------

Web Title: After a long time in the arena of Murkute District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.