दहा वर्षांनंतर पिंपळगाव माळवी तलाव ओव्हरफ्लो .ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 12:35 PM2020-09-22T12:35:25+5:302020-09-22T12:35:45+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनंतर सोमवारी सायंकाळी तुडुंब भरला .सायंकाळी सहा वाजता तलावाच्या सांडव्या मधून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली .तलाव भरल्यामुळे पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे .
| पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनंतर सोमवारी सायंकाळी तुडुंब भरला .सायंकाळी सहा वाजता तलावाच्या सांडव्या मधून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली .तलाव भरल्यामुळे पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर पिंपळगाव माळवी येथे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा तलाव आहे .१९२० सालि ब्रिटिशांनी शहराला पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी हा तलाव बांधला.तब्बल १९९० सालापर्यंत शहराला या तलावातून पाणीपुरवठा सुरु होता .मुळा धरणातून नवीन पाणीयोजना झाल्यानंतर या तलावातून पाणीपुरवठा बंद झाला व महानगरपालिकेचे तलावाकडे दुर्लक्ष सुरू झाले या तलावातिल पाण्यावरती पिंपळगाव, डोंगरगण मांजरसुंबा, जेऊर या गावाचा पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्यामुळे त्यांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पुढील तीन वर्षे पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याची अडचण येणार नाहि. पूर्वीच्या काळात तलाव कायम भरलेला असल्यामुळे अनेक परदेशी पक्षी येत असल्यामुळे शहरातील निसर्गप्रेमींचा येथे नियमित राबता असायचा . तलाव कोरडा झाल्यानंतर यातील माती शेतकऱ्यांनी काढल्यामुळे तलावाची खोली वाढून त्याची क्षमता वाढली आहे . तलाव परिसरात अनेक आदिवासी कुटुंब रहात असून मासेमारी हा त्यांच्या व्यवसाय असल्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील मिटला आहे .परंतु या तलावाच्या देखरेखीकडे महानगरपालिकेचे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. तलावाच्या भिंतीवर मोठ मोठि झाडे वाढली असून त्यामुळे भिंतीला धोका निर्माण झाला आहे .या परिसराची संपूर्ण स्वच्छता केल्यास शहरातील नागरिकांसाठी येथे उत्कृष्ट पर्यटनस्थळ निर्माण होऊन परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील तब्बल सातशे एकरांवर पसरलेला पिंपळगाव तलाव तब्बल दहा वर्षांनंतर सोमवारी सायंकाळी तुडुंब भरला .सायंकाळी सहा वाजता तलावाच्या सांडव्या मधून पाणी बाहेर पडण्यास सुरुवात झाली .तलाव भरल्यामुळे पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे . |