आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; अखेर ‘त्या’ पानटपरीला ठोकले टाळे

By अरुण वाघमोडे | Published: October 20, 2023 03:06 PM2023-10-20T15:06:59+5:302023-10-20T15:08:02+5:30

अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी ते पान स्टॉल सुरू असणारा गाळा कारवाई करत पुन्हा बंद केला आहे. 

After the warning of the movement, the administration woke up, and finally 'that' Pantapari was knocked down | आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; अखेर ‘त्या’ पानटपरीला ठोकले टाळे

आंदोलनाच्या ईशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग; अखेर ‘त्या’ पानटपरीला ठोकले टाळे

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर चर्चेत आलेली शहरातील सीताराम सारडा विद्यालयाजवळची पानटपरी पुन्हा गाळ्यात सुरू झाली होती. याबाबत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जिल्हाधिकारी यांना आंदोलनाचा इशारा देताच जिल्हा प्रशासन, पोलीस, मनपा, सहाय्यक कामगार आयुक्त, तसेच अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी ते पान स्टॉल सुरू असणारा गाळा कारवाई करत पुन्हा बंद केला आहे. 

 जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर किरण काळे यांनी तोफखाना पोलीस निरीक्षक, मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख, सहाय्यक कामगार आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी यांच्याशी संपर्क साधत शाळेतील विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्त परिसर मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले आहे. सर्व विभागांच्या वतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईमध्ये सीताराम सारडा विद्यालयासह न्यू आर्ट्स कॉलेज, रेसिडेन्शिअल कॉलेज व शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या टपऱ्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: After the warning of the movement, the administration woke up, and finally 'that' Pantapari was knocked down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.