उक्कलगाव सोसायटीवर पुन्हा मुरकुटे गटाचे वर्चस्व
By Admin | Published: October 10, 2016 12:39 AM2016-10-10T00:39:49+5:302016-10-10T01:04:39+5:30
श्रीरामपूर : उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे नेते इंद्रनाथ थोरात व अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात
श्रीरामपूर : उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे नेते इंद्रनाथ थोरात व अशोक कारखान्याचे माजी अध्यक्ष रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध होऊन माजी आ. भानुदास मुरकुटे गटाची सत्ता अबाधित राहिली.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे व आ. भाऊसाहेब कांबळे गटाने निवडणुकीसाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना त्यात अपयश आले. रावसाहेब काशिनाथ थोरात यांचा एकच उमेदवारी अर्ज शिल्लक होता. शेवटच्या क्षणी त्यांनीही तो काढून घेतला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली.
इंद्रनाथ थोरात व रावसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी सुकदेव थोरात, बबन निवृत्ती थोरात, प्रकाश किसन जगधने, सुनील बन्सीभाऊ थोरात, पुरुषोत्तम पंढरीनाथ थोरात, भाऊसाहेब रंगनाथ कर्डिले, इंद्रनाथ रावसाहेब थोरात, सुनील शंकर पारखे, अनिता अनिल जगधने, वैशाली वसंत थोरात, बडेराव माधव थोरात व बापूसाहेब गणपत चिंधे हे १२ संचालक बिनविरोध निवडून आले.
यावेळी अशोक कारखान्याचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हिंमतराव धुमाळ, सोसायटीचे माजी अध्यक्ष जनार्दन थोरात, एल. पी. थोरात, विलास थोरात, उपसरंपच विकास थोरात, अरुण थोरात, निवृत्ती थोरात, सोपानराव जगधने, अशोक थोरात, लक्ष्मण थोरात, मंजाबापू थोरात, बाबूराव थोरात, दत्तात्रय थोरात, रायभान थोरात आदी उपस्थित होते. (वार्ताहर)